सांगलीत भाजपला मोठा धक्का, वरिष्ठ पातळीवर माझे अवमुल्यन करण्याचे काम माजी आमदाराचा राजीनामा

0

पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित सांगली लोकसभेत भाजपांतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा उमेदवारी दिल्याने जतचे भाजपचे माजी आमदार विलास जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये मी आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केले. परंतु पक्षाने त्याची दखल न घेता अलिकडे माझ्याविरोधात गट बांधण्याचे तसेच माझे अवमुल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून करण्यात आले आहे. ते मला सहन करणे शक्य नसल्याचे सांगत विलास जगताप यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतो. तरी माझ्या राजीनाम्याचा आपण स्वीकार करावा, असे विलास जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विशाल पाटील मंगळवारी अर्ज दाखल करणार

सांगली लोकसभा मतदारसंघातूनकाँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अपक्ष आणि काँग्रेसतर्फेही ते अर्ज दाखल करतील. सकाळी साडेनऊ वाजता पदयात्रा सुरू होईल. काँग्रेस कमिटीसमोर मेळाव्यात त्याचे रूपांतर होईल. त्यानंतर मोजके लोक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील.