सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असतांना 12 अतिरेक्यांना वाचवायचे काम केलं; राम सातपुतेंचा गंभीर आरोप

0

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री असतांना सुशीलकुमार शिंदे यांनी दहशतवाद प्रतिबंध कायदानुसार कारवाई करण्यात आलेल्या सोलापूरमधील 12 अतिरेक्यांना वाचवायचे काम केले होते असा आरोप सातपुते यांनी केला आहे. हवे तर यादी देतो असे देखील राम सातपुते म्हणाले आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना दहशतवाद प्रतिबंध कायदानुसार अडकलेल्या सोलापूरच्या 12 अतिरेक्यांना वाचवायचे काम केल्याचा गंभीर आरोप भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा येथे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी घेतलेल्या बैठकीत आमदार सातपुते बोलत होते. गेल्या काही दिवसापासून आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली असून, शिंदे यांच्या प्रत्येक टीकेला सातपुते उत्तरे देत आहेत. माझ्या वडिलांवर बोलू नका म्हणतात, मात्र तुम्ही केवळ माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहेत म्हणूनच तुम्हाला उमेदवारी दिल्याचा टोला सातपुते यांनी लगावला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

शिंदेंनी विदेशात चहाचे मळे सुरु केले…

समाज विघातक कृत्ये करणाऱ्यांसाठी 2002 मध्ये सरकारने दहशतवाद प्रतिबंध कायदा केला होता. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सोलापूरमधील दहशतवाद प्रतिबंध कायदानुसार कारवाई करण्यात आलेल्या 12 अतिरेक्यांना वाचवत तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा गंभीर आरोप सातपुते यांनी केला आहे. या बारा अतिरेक्यांना सोडून देण्याचे काम त्यांनी केले असून, हवी तर त्याची मी यादी देतो असेही ते म्हणाले. सोलापूरसाठी तुम्ही काय केले असा सवाल करीत सोलापूर भकास करून दक्षिण आफ्रिका आणि नॉर्थ ईस्टमध्ये यांनीं स्वतःचे चहाचे मळे सुरु केल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे कलंक

महिन्यातून दोन दिवस मतदारसंघात यायचे आणि एकदाच फोटो काढायचा. तोच फोटो तिकडे पंधरा दिवस दाखवत भेटी दिल्याचे दाखवण्याचं काम ताईने केले आहे. असले धंदे मी करीत नाही अशा शब्दात त्यांनी प्रणिती शिंदे याना टोला लगावला. आजवर 75 वर्षात कोणी हिंदूंना आतंकवादी म्हणायचे धाडस केले नव्हते, ते या सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ते सोलापूरचे कलंक असल्याचा घाणाघातही आमदार राम सातपुते यांनी केला.