निवडणुकीआधीच भाजपने उधळला गुलाल; 5 उमेदवार बिनविरोध 197 अर्ज त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट

0

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचा पहिली खूष खबर आली आहे. लोकसभेसोबतच अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी 19 एप्रिलला मतदान आहे. पण त्यापूर्वीच भाजपचे एक-दोन नव्हे तर पाच उमेदवार बिनविरोध विजयी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांच्या मतदारसंघात आता निवडणूकच होणार नसल्याने भाजपची विजयी सुरुवात झाली आहे.

अरुणाचलमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी 19 एप्रिलला मतदान असून, कालपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. पण काही मतदारसंघांमध्ये विरोधकांकडून उमेदवारी अर्जच दाखल करण्यात आले नाहीत. त्यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांचाही मतदारसंघ आहे. त्यामुळे खांडू यांच्यासह भाजपचे (BJP) अन्य चार उमेदवारही बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

अरुणाचलमध्ये 60 जागांसाठी एकूण 197 अर्ज आले आहेत. त्यांची आज छाननी होणार आहे. तर 30 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री खांडू हे मुक्तो मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात विरोधी पक्षांकडून अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.