शरद पवारगटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी; यंदा तिरंगी लढती अनिवार्यच? बारामती, माढा, बीडमधून कोण?

0

काँग्रेसने गुरुवारी सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाची एक संभाव्य यादी पुढे येत आहे. या यादीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासह बीड, माढा, शिरुर, दिंडोरी, वर्धा या जागांचे उमेदवार ठरल्याचं सांगितलं जातंय. शरद पवार गटाची ९ जणांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यामध्ये बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या समदारसंघांचा समावेश आहे. हे मतदारसंघ शरद पवार गटाकडे जावू शकतात, असं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहे.

 

जागा आणि संभाव्य उमेदवार?

बारामती- सुप्रिया सुळे

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

माढा- महादेव जानकर (रासप)

सातारा- बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील

शिरुर- अमोल कोल्हे

नगर दक्षिण- निलेश लंके

बीड- बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे

वर्धा- अमर काळे

काँग्रेसकडून सात उमेदवारांच्या नावांची घोषणा

१. नंदुरबार- गोवाल पाडवी

२. अमरावती- बळवंत वानखेडे

३. नांदेड- वसंतराव चव्हाण

४. पुणे- रवींद्र धंगेकर

५. लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे

६. सोलापूर- प्रणिती शिंदे

७. कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती

दरम्यान, बीडच्या जागेवरुन राज्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर तेच लोकसभेचे उमेदवार असतील, असं सांगितलं जात आहे. तसं झालं तर पंकजा मुंडे यांना विजय अत्यंत सोपा होऊन जाईल. परंतु ज्योती मेटे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली तर मराठा मतं मेटेंना मिळवता येतील. पर्यायाने पंकजांना निवडणूक म्हणावी तेवढी सोपी ठरणार नाही.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पुण्याच्या जागेविषयी राज्यात उत्सुकता आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यातच नुकतेच मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे यावेळची पुणे लोकसभेची चुरस रंगतदार होणार, यात शंकाच नाही.