होर्डींग्जवरील कारवाईमुळे चर्चेतील पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार बदलीनंतरही पुण्यातच?

0

राज्यभरामध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांची देखील बदली करण्यात आली आहे. डॉ. कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे बदलीनंतर देखील कुणाल खेमनार हे पुण्यातच राहणार आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार हे ऑगस्ट 2020 मध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर रुजू झाले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांनी अत्यंत उत्तमपणे कामकाज पाहिलं. तसेच त्यांनी केलेल्या होर्डींग्ज वरील कारवाई मुळे ते चर्चेत राहिले होते. त्यांचा पुणे महापालिकेतला कार्यकाल संपुष्टात आला होता. पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदी त्यांनी तब्बल तीन वर्षा आठ महिने काम पाहिलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीबाबतच्या चर्चा सुरू होत्या.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

दरम्यानच्या काळामध्ये कुणाल खेमनार यांची पुणे जिल्हाधिकारीपदी वर्णी लागू शकते अशा देखील चर्चा रंगल्याचे पाहायला मिळालं. मात्र त्यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली नाही. परंतु कुणाल खेमनार हे आपल्याला पुण्यातच पोस्टिंग मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांची आज बदली झाली असून त्यांची साखर आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बदली नंतर देखील ते पुण्यातच असणार आहेत.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कडक धोरण अवलंबले असून राज्यातील अनेक महानगरपालिका, पालिकामधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आज अनेक महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात आले. यामुळे खेमणार यांचीही बदली करण्यात आली आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?