समुद्रात रायगडच्या कोरलई इथं संशयास्पद पाकिस्तानी बोट?; बोटीतून व्यक्ती उतरल्याचा संशय ‘कोम्बिंग’ सुरू 

0
2

रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.संशयास्पद बोट आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. सगळीकडे तपासणी अन् नाकाबंधी लावण्यात आली आहे. बोटीची तपासणीही करण्यात येत आहे. बोट कुणी आणि का इथं लावली, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. बोटीमधून काही व्यक्ती समुद्रात उतरल्याचा संशय आहे. बोटीबाबत माहिती मिळताच जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती सुरू आहे.

बोटीतून अनेकजण उतरले –

रायगडमधील कोलाई बंदरात खोल समुद्रात आढळलेली ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रायगड पोलिस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

सुरक्षा यंत्रणाकडून मध्यरात्रीपासूनच संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. कोरलईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नोटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व घटने बाबत पोलिस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासनाकडूनही अद्याप कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.