भारताच्या विजयानंतर शोएब अख्तरचा व्हीडिओ व्हायरल; “…समजण्या पलीकडचं आहे”

0
2

टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सलग दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने जून 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर आता अवघ्या काही महिन्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाने महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 252 धावांचं आव्हान भारताने 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारतीय संघाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची सर्वाधिक तिसरी वेळ ठरली. टीम इंडियाच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. अख्तरने या व्हीडिओत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उद्देशून अनेक प्रश्न केले आहेत.

अंतिम सामन्यातील विजयानंतर बक्षिस वितरण करण्यात आलं. उपविजेता न्यूझीलंडच्या खेळाडूंना तसेच पंचांना स्मृतीचिन्ह देण्यात आलं. तसेच भारतीय खेळाडूंना मेडल देण्यात आले. या बक्षिस वितरण समारंभात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी उपस्थित होते. पाकिस्तानकडे या चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद होतं. त्यानंतरही सामन्यााला आणि बक्षिस वितरणासाठी पाकिस्तानकडून (Pcb) एकही सदस्य का नव्हता? जागितक स्तरावरील स्पर्धेत यजमानांचा एकही सदस्य का नव्हता? हे माझ्या समजण्या पलीकडचं आहे, असं म्हणत शोएबने प्रश्न उपस्थित केले आहेत. शोएबने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा व्हीडिओ पोस्ट केला आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

शोएब अख्तर काय म्हणाला?

“भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. मी या सामन्यात एक विचित्र गोष्ट पाहिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एकही नुमाइंदा (सदस्य) इथे उपस्थित नव्हता. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान होता. त्यानंतरही पाकिस्तानचा एकही सदस्य नव्हता. ही गोष्ट माझ्या समजण्या पलीकडील आहे की पाकिस्तानकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि ट्रॉफी देण्यासाठी कुणी का आला नाही? ही जागतिक स्तरावरील स्पर्धा होती. इथे तुम्हाला असायला हवं होतं. मात्र त्यानंतरही यजमानांकडून एकही सदस्य नव्हता”, असं म्हणत शोएबने पीसीबीला अनेक प्रश्न केले आहेत.

अख्तरकडून पीसीबीला प्रश्न

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

यजमान या नात्याने संबंधित क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी आणि सदस्य महत्त्वाच्या सामन्याला हजर असतात. तसेच इतर क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित असतात. भारत-पाकिस्तानचे संबंध चांगले नाहीत. मात्र त्यानंतरही 5 मार्चला बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्यासाठी लाहोरमध्ये उपस्थित होते. मात्र अंतिम सामन्यात यजमान पीसीबीचे पदाधिकारी आणि सदस्यांपैकी कुणीही उपस्थित न राहिल्याने अख्तरने आश्चर्य व्यक्त केलंय. आता पीसीबी किंवा पाकिस्तानच्या माजी खेळाडंकडून अख्तरला कोण उत्तर देतं का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ.