बॉडी वॉश ते गीझर, मुंबईच्या रस्त्यावर महिलांसाठी धावतेय अनोखी बस; पंचतारांकित हॉटेलपेक्षा नाही कमी

0
1

शाम्पू, गीझर, अंघोळीची परिपूर्ण सुविधा, तेही चालत्या बसच्या आत. ऐकून आश्चर्यचकित झालात ना. विशेष म्हणजे ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. होय मुंबईच्या रस्त्यावर एक अनोखी बस धावतेय. या विशेष बसचा महिनाभरात मोठ्या संख्येने महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. ही बस आहे एक मोबाईल बाथरूम आहे. या मोबाईल बाथरूमचे (Bathroom bus) व्यवस्थापन बी द चेंज नावाची संस्था करत आहे. तीन बहिणी मिळून महिलांना अंघोळीची ही सुविधा देणारी बस चालवतात. यातून त्या महिलांना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे काम करत आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी सहकार्य केले आहे. महिलांना मोफत शॉवर सेवा खूप आवडत असल्याचा फीडबॅक आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

‘या’ मोबाईल बाथरूममध्ये काय काय आहे?

या अत्याधुनिक मोबाईल बाथरूमध्ये पाच मोबाईल फोन चार्जर आणि दोन कपडे सुकवण्याचे ड्रायर आहेत. हँडवॉश, बॉडीवॉश, शाम्पू, टब आणि गीझर या सुविधासुद्धा उपलब्ध आहेत.