मविआपाठोपाठ मनसेलाही ईव्हीएमवर संशय; म्हणाले, ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य…

0
1

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 230 जागा जिंकत महायुती सत्तेत आली आहे. तर केवळ 49 जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं आहे. मनसेला तर एकही जागा जिंकता आलेली नाही असं असताना ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीने संशय व्यक्त केलेला असतानाच मनसेने देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. मागच्या काही दिवसापासून जे व्हीडिओ समोर येत आहेत. ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही दहा वर्ष जे आमदार भेटत नव्हते ते आमदार एकेक लाखाच्या मताने निवडून आलेत. ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य आहे. ईव्हीएमने घात केला आहे. ईव्हीएममुळे अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे, असं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

मनसेला ईव्हीएमवर संशय
एवढा मोठा विजय मिळवून देखील भारतीय जनता पक्षात आनंद व्यक्त होत नाही. ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष किती एकत्र एकत्र आला तरी होणार काही नाही. देशात काहीतरी चुकीचं चाललंय हे आता कळलं पाहिजे. अमेरिका सारख्या देशात जर बॅलेट वर मतदान होत असेल तर मग इथे कशाला ईव्हीएम पाहिजेत. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसेची सुद्धा फसवणूक झाली आहे. न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांची मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? या पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाही असा प्रश्न आता मला पडला आहे. हा निकाल सेट होता सगळेच यांचे निवडून आले असते तर लोकांनी यांना चपलेने मारलं असतं, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

अविनाश जाधव काय म्हणाले?
ईव्हीएमबाबत राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील. उमेदवारांना लोक शिव्या घालत होते त्या लोकांना… निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची लाट होते ही दिसत नव्हती या उलट भारतीय जनता पक्षाबद्दल चा राग दिसला. निवडणुकीत एक पिक्चर तयार केला. त्यात लाडकी बहीण बसवली, बटेंगे तो कटिंग हे बसवलं गेलं. निकालानंतर मनसेच्या झालेल्या बैठकीत राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. लवकरच राज ठाकरे यावर बोलणार आहेत…, असं जाधव म्हणाले.

राज ठाकरे जेव्हा बोलतील त्यावेळी राज्याला कळेल ह्या निवडणुकीमध्ये काय काय झालं. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत आमची कोणतीही अपेक्षा नाही. मनसे आणि राज ठाकरे यांची फसवणूक महायुती एवढी कोणीच केली नाही. लोक सभेवेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र त्याची परतफेड आता महायुतीने कशी केली आहे हे तुम्हीच बघताय, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे