माहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाण

0

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माहीमचा मुद्दा तापला होता. माहीम मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवरणकर आणि मनसेच्या अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर, ठाकरेंच्या शिवसेनेनंही माहीममधून उमेदवार उतरवला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र माहिममधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं माहीम मतरदारसंघ चर्चेत आहे. शिवसेनेचा (ठाकरे) उमेदवार महेश सावंत हेदेखील रिंगणात उतरले आहेत. असं असले तरी उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माहीम मतदारसंघात सभा घेण्याची मला आवश्यकता नाही. माहीम हा माझा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

माहीम मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे, शिवसेना ठाकरे पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे सेनेचे सदा सरवणकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळं या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा होणार नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मुंबईत बुधवारी सभा झाली. 17 तारखेलाही सभा होणार आहे. शिवाजी पार्कला ही सभा घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

शिवाजी पार्कवर कोणाची सभा होणार?

17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान सभेला मिळावे यासाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना दोघेही आग्रही आहेत. 18 नोव्हेंबरला दुपारी प्रचार बंद होत असल्याने, 17 नोव्हेंबरची रात्रीची शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानावर व्हावी, असा दोन्हीही ठाकरेंचा आग्रह आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी इतर राजकीय पक्षास सहभाग घेण्यास परवानगी दिल्यास संघर्ष उद्भवू शकतो, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी महापालिका निवडणूक आयोगाकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे पत्र सोपवलं आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मनसेने १३९ उमेदवार रिंगणात

गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १०१ उमेदवार रिंगणात उतरविले होते. यापैकी एक उमेवार निवडूण आला होता. १२ लाखांहून अधिक म्हणजे २.२५ टक्के मते मिळविली होती. यंदा ३८ अधिक म्हणजे १३९ उमेदवार मनसेने रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे यंदा किती जण निवडून येतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल.