‘तृप्ती- राजकुमारच्या विकी विद्या..’ने जिगरालाही मागे टाकले, सलग तिसऱ्या दिवशी कमवले ‘एवढे’ कोटी

0

सध्या बॉलिवूडमध्ये राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असणारा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाच उतरल्याचं चित्र आहे.११ ऑक्टोबर रोजी रिलिज झाल्यानंतर या चित्रपटानं भारतात तब्बल १९ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं आलिया भट्टच्या जिगरा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिल्याचं दिसत असून दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर आलियाचा जिगरा चांगलाच आपटल्याचं दिसतंय.

राजकुमारच्या स्त्री २ ची क्रेझ आतापर्यंत कायम असताना त्याच्या दुसऱ्या चित्रपटानंही चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई केल्याचं दिसतंय..

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

बॉक्सऑफीसवरही वाजला विकी विद्या..

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी, मल्लिका शेरावत यांच्या दमदार भूमिका असणारा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ या चित्रपटानं पहिल्या दिवश्शी ५.५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ६.९ कोटी तर तिसऱ्या दिवशी ६.२५ कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटाची एकूण कमाई ही 21.08 टक्के होती.

कुटुंबासह ऋषिकेशमध्ये हरवलेली “सुहागरात सीडी” परत मिळवण्यासाठी विकी आणि विद्या बाहेर पडतात. मल्लिका शेरावतचे पात्र, चंदा राणी आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने, हे जोडपे पोलिस आणि कुटुंबातील ज्येष्ठांना आवाहन करण्यापासून ते रात्री स्मशानभूमीत जाण्यापर्यंत कोणतीही कसर सोडत नाही. असे कथानक असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

चेन्नईमध्ये सर्वाधिक पाहिला जातोय सिनेमा

11 ऑक्टोबरला प्रदर्शित झाल्यापासून देशभरातील सिनेमागृहांमध्ये राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी यांची प्रमुख भूमिका असणारा कॉमेडी चित्रपट विकी विद्या का वो वाला व्हिडिओ देशभरात चांगलाच गाजतोय. चेन्नईमध्ये सर्वाधिक हा सिनेमा चालत असल्याचे सांगण्यात येतं. या चित्रपटाने पहिलाच दिवशी तीन कोटींची कमाई केली असून. चेन्नईमध्ये सर्वाधिक 69.33% तर बंगळुरू मध्ये 35% प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला. कोलकत्ता आणि दिल्लीमध्ये ही हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती.