खूप रडवले आणि पैसेही नाही दिले ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

0

अभिनेत्री उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेदची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. उर्फी जावेदने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. लोक उर्फी जावेदवर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टीका कायमच करताना दिसतात. मात्र, होणाऱ्या टीकेचा काहीही परिणाम हा उर्फी जावेदवर अजिबातच होत नाही. उर्फी जावेदने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत.

उर्फी जावेद हिने नुकताच आता मोठा खुलासा केलाय. अभिनय क्षेत्रामध्ये साईड कलाकारांना कशाप्रकारची वागणूक दिली जाते, याबद्दल तिने भाष्य केले आहे. उर्फी जावेदने मुलाखतीमध्ये म्हटले की, मला कधीच टीव्ही क्षेत्रामध्ये परत पुनरागमन करायचे नाहीये. टीव्हीचे बरेच प्रोडक्शन हाऊसेस खूप जास्त खराब आहेत. ते आपले पैसे कापून देतात आणि पैसे देण्यासही खूप जास्त उशीर करतात.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

खूप जास्त खराब लोक टीव्हीमध्ये आहेत. मी ज्यावेळी टीव्ही मालिकेमध्ये काम करत होते, त्यावेळी माझी स्थिती खूप जास्त वाईट होती. कारण मी साईड रोल करत. खूप जास्त रडवायचे प्रोडक्शनवाले. हा मी खरोखरच बिग बॉसच्या निर्मात्यांचे धन्यवाद मानते. कारण माझ्यासाठी खरोखरच ती एकप्रकारची मोठी संधी नक्कीच होती.

तो अनुभव माझ्यासाठी चांगलाच राहिला…ठिक आहे काहीही असो मी बिग बॉसच्या घरात एक आठवडाभर थांबले. तिथून मी निघाल्यावर अनेक गोष्टी माझ्यासाठी नक्कीच बदलल्या. माझे करिअरमध्ये खूप जास्त उंच गेले. पण आता मला अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करायचे आहे. माझे हे बोलणे ऐकून परत वेगवेगळे अर्थ काढले जातील.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मला जर विचारले जाईल की, तुला परत बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचे आहे तर नाही. मला आता चित्रपट करायचे आहेत किंवा ओटीटीवर यायचे आहे. म्हणजे काय तर आता उर्फी जावेद ही एखाद्या चित्रपटाच्या शोधात आहे किंवा तिला वेब सीरिजमध्येही काम करायचे आहे. आता उर्फी जावेद हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.