फडणवीसांचे विश्वासू भेटीला ….मनोज जरांगे नरमले?; सरकारला हे मोठं आवाहन, 1तास दोघांमध्ये काय चर्चा?

0

राज्यामध्ये सुरू असलेली सामाजिक दुही आणि टोकाचा संघर्ष हा तळागाळापर्यंत पोहोच लेला असताना मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अचानक झालं गेलं ते सर्व सोडून पुन्हा चर्चेची तारीख खुली केली! ही सामाजिक बदलाची नवी सुरुवात करत मनोज जरांगे यांनी घेतलेला यु-टर्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती वेगळे संकेत देत आहेत. 20 जुलैचं तोंडावर आलेले उपोषण आणि त्यानंतरच्या राज्यभर चा शांतता दौरा या दोन गोष्टींचा विचार केला तर राज्य शासनाच्या वतीने झालेला बदल हा सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार यात शंका नाही. महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी या दोन बहुजन समुदायांमध्ये सुरू असलेल्या संघर्ष अचानक म्हणून जरांगे पाटील यांनी घेतलेल्या संयमाच्या भूमिकेमुळे मिटून पुन्हा एकदा सर्व एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे संकेत घेऊन येत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आमदार राऊत हे जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आज अंतरवाली सराटीत आले होते. मनोज जरांगे पाटील यांचे मागील आमरण उपोषण सोडवण्यासाठी राऊत यांनी मध्यस्थी केली होती.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

एक तासाहून अधिक वेळ दोघांमध्ये चर्चा….

आमदार राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जाते. आज राऊत यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. दरम्यान काल मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज लगेच आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्यात एका तासापासून अधिक वेळ चर्चा झाली. 20 जुलै रोजी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये महत्वाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मनोज जरांगे 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दोन महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र, जरांगे यांनी एका महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत निर्णय घेण्यासाठीची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली असून मनोज जरांगेंनी 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.

पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅलीचा पुढचा टप्पा 

सरकारने आरक्षणाची मागणी पूर्ण केली नसून यावेळी कडक आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी यापूर्वी दिला होता. 20 तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्याची हाक त्यांनी दिली होती. दरम्यान, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात आल्यानंत आता शांतता रॅलीचा पुढचा टप्पा ठरवण्यासाठी पूर्वनियोजन बैठक बोलवण्यात आली आहे. पुढच्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात कुठे कुठे शांतता रॅली होणार? कसे नियोजन असणार यावर पश्चिम महाराष्ट्रातील समन्वयकांसोबत आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे चर्चा करणार आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन