राहुल गांधींच्या विधानाने संसदेत गदारोळ ….. ही गंभीर बाब; मोदी शाह यांनीही खडसावले?

0

संसदेत अधिवेशनाचा आज सहावा दिवस सूरू आहे. या सहाव्या दिवशी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला होता. ”जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, आणि चोवीस तास हिंसा, हिंसा, हिंसा, द्वेषात,द्वेषात, द्वेषात गुंतले आहेत. त्यामुळे तुम्ही मुळीच हिंदू नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

राहुल गांधी लोकसभेत बोलत होते. लोकसभेत राहुल गांधींनी भाषणाची सुरुवात जय संविधानाने केली आणि ते म्हणाले की, भाजपचे लोक दर दोन-तीन मिनिटांनी जय संविधानाचा जप करतात हे चांगले वाटते. आम्ही देशातील जनतेसोबत मिळून त्याचे रक्षण केले आहे. संपूर्ण विरोधक आयडिया ऑफ इंडिया वाचवत आहेत,असे राहुल गांधी यांनी सांगितले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

राहुल गांधींनी यावेळी मोदींच्या भाषणाचा एक मुद्दाही सांगितला आहे. भारताने कधीही कोणावर हल्ला केला नाही. त्याला कारण आहे. भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला, घाबरू नका, घाबरू नका. भगवान शंकर म्हणतात, घाबरू नका, घाबरू नका आणि त्रिशूळ जमिनीत गाडून टाका. दुसरीकडे, जे स्वतःला हिंदू म्हणवतात, ते चोवीस तास हिंसा-हिंसा-हिंसा, द्वेष-द्वेष-द्वेषामध्ये गुंतले आहेत. तुम्ही मुळीच हिंदू नाही, अशी टीका राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केली.

राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर सत्ताधारी पक्षानी गदारोळ सुरू केला. त्यानंतर पीएम मोदी आपल्या खुर्चीवरून उभे राहिले आणि त्यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मोदींच्या या विधानावर राहुल गांधी म्हणाले, पीएम मोदी आणि भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. यानंतर गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याने आपल्या बोलण्याबद्दल माफी मागावी. करोडो लोक या धर्माला अभिमानाने हिंदू म्हणतात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इस्लाममधील अभय मुद्रेवर इस्लामिक विद्वानांचे मत घ्यावे, असा सल्ला राहुल गांधींना दिला.