नाशिक मध्ये सस्पेन्स वाढताच इच्छूकांची सावध प्रतिक्रिया

0

नाशिक लोकसभा निवडणुकीचा महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर होऊ शकलेला नाही. त्यामुळे उमेदवारीच्या चर्चेत असलेले महायुतीचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीवर स्पष्ट बोलणं टाळल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवारी मलाच मिळेल अशा भूमिकेत असलेले नाशिकच्या उमेदवारीसाठी महायुतीचे इच्छुक नेते आता उमेदवारी संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशा प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. आज देखील मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा संदर्भात विचारले असता त्यावर भुजबळ यांनी प्रफुल पटेल हे निर्णय घेतील आणि चर्चा फोनवर करू असे स्पष्ट सांगितले आहे.

नाशिक लोकसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीमध्ये अजूनही एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची प्रचार यंत्रणा झपाट्याने कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, महायुतीचे इच्छुक उमेदवार असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ हे मात्र आता सावध भूमिका घेत माध्यमांसमोर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला महायुतीतल्या कुठल्या पक्षाला जाणार आणि कोण उमेदवार असणार हे आता वरिष्ठांच्या चर्चेतूनच समोर येईल. त्यामुळे मलाच उमेदवारी मिळेल आणि आमच्याच पक्षाचा उमेदवार असेल अशा वल्गना करणारे इच्छुक उमेदवार आता सावध भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मंत्री छगन भुजबळ यांनी देखील चंद्रपूर येथे प्रचारासाठी जात असताना महायुतीचे उमेदवार प्रचारासाठी बोलवत असेल, तर जाणे हे आमचे काम आहे आणि उमेदवारी संदर्भात कोणतीही चर्चा होणार नाही आमचे नेते प्रफुल पटेल हे चर्चा करतील आणि फोनवरून त्या संदर्भात आम्ही बोलून निर्णय घेऊ असे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदार संघाचा महायुतीचा उमेदवार कोण असणार या संदर्भात अधिक सस्पेन्स वाढताना पाहायला मिळत आहे.

मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू असताना मागील आठवड्यापासून भुजबळांच्या उमेदवारी संदर्भातील चर्चा या कमी होऊ लागल्या आहेत. भुजबळांना होणारा विरोध आणि पुन्हा नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू असल्यामुळे आता महायुतीतील वातावरण हे काहीसे चलबीचल परिस्थितीत असल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील तयार होऊ लागले आहेत. महायुतीचा जो उमेदवार जाहीर होईल त्या उमेदवाराचा आम्ही सर्व युती म्हणून प्रचार करू आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू अशा भूमिकेत आता सगळेच महायुतीचे इच्छुक उमेदवार पाहायला मिळत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना महायुतीच्या नेत्यांकडून नेमक्या काय सूचना आले आहेत आणि उमेदवार केव्हा ठरणार असे एक ना अनेक प्रश्न आता नाशिक लोकसभा मतदार संघात उपस्थित होऊ लागली आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार