भिवंडीत होणार तिरंगी लढत; वंचितकडून निलेश सांबरेना उमेदवारी

0

भिवंडी लोकसभा निवडणुकीत जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष हे अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज वंचितच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भिवंडी लोकसभेसाठी निलेश सांबरे याना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण पाठोपाठ भिवंडी लोकसभा मतदार संघ हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मनाला जात आहे. या मतदार संघात महायुतीकडून कपिल पाटील यांना तर, महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे याना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याचवेळी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांनी देखील भिवंडीतून निवडणुक लढविण्याचे संकेत दिले होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मात्र, ते अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच गुरुवारी वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत भिवंडी लोकसभा मतदार संघातून निलेश सांबरे याना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भिवंडीत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.