पूणे सव्वा वर्षाच्या चिमकुल्याचे आयुष्य संपवले; अनैतिक संबंधाचे काळीमा फासणारे क्रुरकृत्य

0

पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. पण याचं विद्येच्या माहेरघरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतचं चालले आहे. कधी कोयता गँगची घटना तर कधी अपहरणाची घटना. या सर्व घटना पुण्याच्या प्रतिमेला सतत गालबोट लावतचं असतात. पण तरीही पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात पुन्हा एकदा घडली आहे. ज्याने पुणेच नाही तर महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनैतिक संबंधातून गुन्हे घडणं हे काही नवीन नाही. पण याच अनैतिक संबंधांमुळे एका बाळाचं आयुष्य पोहळून गेलं. पुण्यातील चाकण पोलीस हद्दीत ही धक्कदायक घटना घडली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अनैतिक संबंधांमुळे प्रियकराने प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात टाकले. उकळत्या पाण्यात टाकल्याने बाळाचे संपूर्ण शरीर भाजले आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. पुण्यासारख्या शहरात जिथे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासन कसोशीचे प्रयत्न करत आहेत, त्याचवेळेस अशा घटना घडून प्रशासनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहे.

चाकण पोलीस हद्दीत ही घटना घडली असून शरद विक्रम कोळेकर असं गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केली असताना असे दिसून आले की, आरोपी आणि बाळाच्या आईचे अनैतिक संबंध होते. प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन बाळाला बाथरुमध्ये त्याचे हात पाय बांधून उकळत्या पाण्यात टाकले. बाळाचे संपूर्ण शरीर भाजले आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाईट असून ती फक्त थांबवणेच गरजेचं नाही तर ती नष्ट करायला हवी. पुण्यात सुरु असलेले हे प्रकार कधी थांबणार असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली असून आरोपी सध्या फरार आहे. फिर्यादीसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते. ज्यावेळीस ही घटना घडली तेव्हा फिर्यादी उपस्थित होत्या. त्यांनी तात्काळ बाळाला पाण्यातून काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु रुग्णालयात नेण्यापर्यंत फार उशीर झाला होता आणि उपचारादरम्यानच बाळाचा मृत्यू झाला. आता या परिस्थितीत पोलीस पुढे काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन