पंतप्रधान मोदींचं लेक्स फ्रिडमनच्या पॉडकास्ट गुजरात दंगलीबाबत मोठं विधान, म्हणाले… 2002 नंतर 2025 पर्यंत कोणतीही मोठी घटना

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेक्स फ्रिडमॅन यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये अनेक मुद्य्यांसह 2002मध्ये झालेल्या गुजरात दंगलींबाबतही आपलं मत व्यक केलं. त्यांनी म्हटले की, 27 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांचे सरकार(त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते) अर्थसंकल्प सादर करणार होतं. तेव्हाच गोध्रा रेल्वेच्या घटनेची माहिती मिळाली. ही एक अतिश गंभीर घटना होती. लोकांना जिवंत जाळलं गेलं होतं. या घटनेबाबत खोटं पसरवलं गेलं आणि माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 2002च्या आधी गुजरातमध्ये सलग दंगली घडत होत्या. मात्र 2002 नंतर 2025 पर्यंत कोणतीही मोठी घटना घडली नाही. तसेच त्यांनी म्हटले की, 2002च्या दंगलीबाबत तुम्ही बोलण्यापूर्वी, मी तुम्हाला परिस्थितीची योग्य कल्पना देण्यासाठी मागील काही वर्षांचे चित्र सादर करू इच्छितो. 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे अपहरण केले गेले आणि कंधारला नेण्यात आले. संपूर्ण देश हादरला होता, कारण अनेकांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न होता.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

यानंतर वर्ष 2000 मध्ये लाल किल्ल्यावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनंतर आणखी एक वादळ उठलं. यानंतर 11 सप्टेंबर 2001च्या अमेरिकन ट्वीन टॉवर्सवर खूप मोठा दहशतवादी हल्ला झाला. ऑक्टोबर 2001मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर दहशतवादी हल्ला झाला. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. हे जागतिकस्तरावरील दहशतवादी हल्ले होते. ज्यांनी जागतिक अस्थिरतेची ठिणगी पेटवली. या घटनांच्या दरम्यान 7 ऑक्टोबर 2001रोजी मला गुजरातचं मुख्यमंत्री बनवलं गेलं होतं.

मोदींनी पुढे सांगितलं की, त्यावेळी गुजरातमध्ये फार मोठा भूकंप आला होता. हजारो जणांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या पहिल्याच दिवसापासून मी यासंदर्भातील कामास लागलो होतो. मी एक असा व्यक्ती आहे, ज्याचा सरकार नावाशी संबंध राहिला नव्हता, सरकार काय असतं, मला माहीत होतं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

24 फेब्रवारी 2002 रोजी पहिल्यांदा आमदार बनलो. माझे सरकार 27 फेब्रवारी 2002 रोजी अर्थसंकल्प सादर करणार होते आणि त्याच दिवशी आम्हाला गोध्रा ट्रेनमधील घटनेची माहिती मिळाली. ही फार गंभीर घटना होती. लोकांना जिवंत जाळलं गेलं होतं. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, की मागील सर्व घटनानंतर स्थिती कशी राहिली असेल. जे म्हणत होते की ही फार मोठी दंगल आहे, हा भ्रम पसरवण्यात आला आहे. वर्ष 2002च्या आधी गुजरातमध्ये 250 पेक्षा जास्त मोठ्या दंगली घडल्या होत्या.