अजित दादांच्या राष्ट्रवादीत मोठ्या नेत्यांचं इन्कमिंग, अमोल मिटकरींचे सूतोवाच, म्हणाले ‘अनेकजण भेटून गेले दादांना..’

0

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या नेत्यांचं इन्कमिंग होणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय .महाविकास आघाडीतील अनेक पक्षातील आमदार आणि खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं ते म्हणालेत .ते अकोला येथे ‘एबीपी माझा ‘शी बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात घटनांना वेग आला आहे .पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे ठरवल्यानंतर आता शरद पवारांच्या गोटातून काही बडे नेते अजित दादांना भेटून गेले असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांना नियुक्त केल्यानंतर या निर्णयाचे स्वागतही अमोल मिटकरी यांनी केलं .देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .दरम्यान कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत OSD – PA यांच्या वरून झालेल्या निर्णयावरही महत्त्वाचे गौप्यस्फोट मिटकरींनी केले आहेत .

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

काय म्हणाले अमोल मिटकरी ?

अजित पवारांच्या काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या नेत्यांचे इन्कमिंग होणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘एबीपी माझा’ ला सांगितलं .ते म्हणाले ,महाविकास आघाडीतील अनेक पक्षातील आमदार आणि खासदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत .महाराष्ट्राला लवकरच ही नावे कळणार असल्याचंही मिटकरी म्हणालेत .पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार खासदार अजितदादांना भेटून गेल्याचं ते म्हणाले .यात विजय भांबळे राहुल मोटे आणि राहुल जगताप यांच्या संदर्भात लवकरच हालचाल होणार असल्याचेही त्यांनी सुतोवाच केलं .यासंदर्भात महायुतीतील इतर मित्र पक्षांची ही मतं लक्षात घेतले जाणार असल्यासही ते म्हणालेत .

अधिक वाचा  दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील सोलापूरचा संगणक अभियंता गजाआड; एटीएसची पुणे स्टेशनवर मोठी कारवाई

दलाली करणाऱ्या फिक्सरची OSD पी एस म्हणून नियुक्ती होऊन देणार नाही असा पवित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर या मुद्द्याला हात घालत ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला घेरलेलं असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार अमोल मिटकरी यांनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे .रोजगार मंत्री असताना संदिपान भुमरे यांच्या तत्कालीन ओएसडीनं पाच कोटींच्या कामासाठी पाच लाखांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी काल बोलताना केला होता .संदिपान भुमरे यांच्यानंतर मिटकरींनी आणखी काही महत्त्वाच्या शिंदे गटातील आमदारांची नावे घेतली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.