स्वारगेट बस बलात्कार प्रकरण मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तत्काळ पोलीस आयुक्तांना फोन लावून म्हणाले…

0

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तत्काळ पुणे पोलीस आयुक्तांना दुरध्वनीद्वारे संपर्क करून लवकरात लवकर आरोपीला बेड्या ठोकण्याचे निर्देश दिले आहेत.स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रेय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. पीडित २६ वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. त्यावेळी तिच्याशी गोड बोलून एसटीमध्येच आरोपीने बलात्कार केला.

पुणे बलात्कार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पुणे प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत दुपारी तीनच्या सुमारास चर्चा केली. प्रकरण गंभीर असून तत्काळ तपास पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. फरार आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन तपासही लवकर पूर्ण करा तसेच संबंधित प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

घटना नेमकी कशी घडली?

पीडित तरुणी मूळची फलटणची आहे. ती पुण्यात कामासाठी राहते. मूळगावी जाण्यासाठी ती स्वारगेट एसटी स्टँडला आली. तेव्हा तेथे उभा असलेल्या आरोपीने तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. कुठे जायचे आहे, अशी विचारपूस केली. त्यावर फलटणला जायचे आहे, असे तरुणीने सांगितल्यावर संबंधित गाडी येथे लागत नाही, समोरच्या फलाटावर लागते, असे आरोपीने सांगितले. मुलगी एसटीमध्ये जाताच त्याने गाडीचे लॉक लावून अंधाराचा फायदा घेऊन तरुणीवर अतिप्रसंग केला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिम्मत झाली.

आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये

स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही.