९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: दिवसभर सभामंडप ‘हाउसफुल’ कवी संमेलनाचा 11 तासाचा विक्रम

0

नवतरुणी तिचे सौंदर्य, सौंदर्यातील विविध छटा, प्रेम प्रकरण, प्रेमभंग, यापासून ते निसर्गातील विविध छटा निसर्गाचे विविध रूप, शेतकऱ्यांची व्यथा, शाळा, आपले गाव, शहर आदीचे वर्णन करणाऱ्या कवितांनी आज दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतील सयाजीराव गायकवाड सभामंडपात कवी संमेलनाने तब्बल 11 तासाहून अधिक काळ सुरू राहण्याचा विक्रम केला. राज्यभरातून आलेले नवकवी आणि त्यांना दाद देणारे काव्यप्रेमींनी दिवसभर सयाजीराव गायकवाड सभामंडप हाउसफुल झाला होता. रात्री दहा पर्यंत या मंडपात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी ओसंडून वाहत होती.

दिल्लीत भरलेल्या ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड सभामंडप, व छ. संभाजी महाराज विचारपीठ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रदीप पाटील, आयएएस. रोहिणी भाजीभाकरे, युवराज नळे,निखिल आण्णा घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

यावेळी देहू येथून आलेले तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. रामदास महाराज यांच्यासह देहुतील इतर वारकऱ्यांचे सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

11 तासाहून अधिक काळ चाललेले या कवी संमेलनात राज्यभरातून आलेल्या 110हून अधिक नवकवींनी आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही अशी व्यथा मांडण्यापासून ते तरुणींचे सौंदर्य, तिचा सहवास मिळावा यासाठी अतुर झालेल्या प्रेमींच्या मनातील भावना, निसर्ग, रानातील सौंदर्य आदी विषयांवर कवींनी आपल्या मनातील भावना आपल्या कवितांमधून व्यक्त केल्या. तर दुसरीकडे भारतात सध्या सुरू असलेल्या विविध धार्मिक विचारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर, महापुरुषांच्या विचारावर काहींनी कविता सादर केल्या.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

कविता सादर करणाऱ्यांमध्ये राज्यातील प्रामुख्याने रमेश रेळेकर, विक्रम शिंदे, प्रा. नितीन नाळे, अँड. जयश्री तेरकर, मीना महामुनी, बाळासाहेब गिरी, जितेंद्र सोनवणे, प्रतिभा मगर. कृष्णा साळुंखे, युसुफ सय्यद. आणि बेळगाव येथून आलेले रवींद्र पाटील यांच्यासह ११० हून अधिक कवींनी कविता सादर केल्या.