अखेर ते प्रकरण भोवलेच, नवनीत राणा यांना कोर्टाची नोटिस; २८ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश

0

भाजपाच्या नेत्या, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने नोटिस धाडली असून येत्या २८ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. हैदराबादमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटिस बजावली आहे. नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान दिले होते.त्या प्रकरणात कोर्टाने ही नोटिस बजावली आहे.

अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते. या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान १५ मिनिटांसाठी पोलिस हटवा मग आम्ही दाखवतो. आम्ही काय करु शकतो ते ? असे वक्तव्य केले होते. या प्रकरणात हैदराबादमधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठेन आले होते आणि कुठे गेले होते.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार? 

 

नवनीत राणा साल 2019 अपक्ष खासदार झाल्या

2019 मध्ये अमरावतीतून नवनीत राणा यांनी शरद पवार यांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने खासदारकीची निवडणूक लढवून त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर अचानक त्यांनी भाजपासाठी काम करणे सुरु केले होते. आमदार रवी राणा यांचा स्वत:चा पक्ष आहे हे परंतू महाविकास आघाडीच्या काळात दोघा पती – पत्नी भाजपाच्या कळपात जाऊन तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील कलानगर या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलन केले होते. त्यानंतर नवनीत राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर बक्षिस म्हणून भाजपाने त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीवेळी भाजपात अधिकृत प्रवेश केला होता.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर असदुद्दीन ओवैसी आणि कांग्रेस पक्षाने भाजपा नेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती.ओवैसी यांनी म्हटले होती की, “मी पंतप्रधान मोदींकडून 15 सेकंद,नव्हे एक तास देण्याची मागणी करतो, आम्हाला कोणतीही भीती नाही.आम्ही पाहू इच्छतो की मानवता किती शिल्लक राखली आहे.”

या संपूर्ण विवादानंतर, हैदराबाद कोर्टाने नवनीत राणा यांना नोटिस जारी केली आहे त्यांना 28 फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता ही कायदेशीर लढाई कुठल्या पातळीवर जाणार हे येणारा काळच ठरवणार आहे.