वेताळ टेकडीवरून बालाभारती ते पौड फाटा या प्रस्तावित रस्त्याचा प्रचंड विरोध झाल्यानंतरही मार्ग अखेर मोकळा झाला असून या प्रकल्पावर गत दीड वर्षांपासूनची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. कर्वे रोड, पौड रोड, लॉ कॉलेज रोड आणि सेनापती बापट रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने बालभारतीपासून थेट पौड फाट्यापर्यंत रस्ता प्रस्तावित केला. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार, हा रस्ता बालभारती येथून सुरु होता. वेताळ टेकडीवरून विधी महाविद्यालयाच्या पाठीमागून केळेवाडी येथील पौड फाट्याजवळ संपतो. यासाठी 252 कोटी 13 लाख रुपये खर्च प्रस्तावित केला. सर्वसामान्य पुणेकरांच्या हितासाठी आपली भूमिका न घेता विशिष्ट वर्गासाठी चेतना जागृत करणाऱ्या समुदायाला उच्च न्यायालयाने चपराक दिली असल्याने अखेर आमचा लढा यशस्वी झाला असून तातडीने सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करावे यासाठी पुणे महापालिका स्तरावरती पाठपुरावा सुरू केला असून पुणे महापालिकेसह पुणेकरांच्या हितार्थ आम्ही देखील कॅव्हेट करणार आहोत अशी माहिती पुणे महापालिका माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर यांनी न्यूजमेकरशी बोलताना सांगितले.






सदरील रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने येथील पर्यावरणाची हानी होणार असल्याचा दावा करत पर्यावरण प्रेमी नागरिक आणि संघटनांनी यास विरोध केला. पाण्याचे झरे आटतील, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईल, पुण्यातील टेकड्या, जैवविविधता नष्ट केली जात आहे असे आरोप या रस्त्याच्या विरोधात हजारो नागरिकांनी मोर्चा देखील काढला होता. नागरिकांच्या विरोधामुळे सत्ताधाऱ्यांनीही या रस्त्याबाबत सावध भूमिका घेतली होती. पण महानगरपालिका या रस्त्यासाठी आग्रही होती. या कामासाठी सप्टेंबर 2023 मध्ये निविदा प्रक्रिया सुरु केली जाणार होती, पण नागरिकांचा विरोध वाढल्याने हे काम थांबवण्यात आले. त्याचवेळी हा प्रकल्प पर्यावरण विरोधी असल्याचा आरोप करत नागरी चेतना मंचाने उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली. त्यामध्ये या कामावर स्थगिती देण्यात आली होती. या रस्त्याला विरोध करणारी पर्यावरण प्रेमी आणि चेतना मंचची याचिकाही फेटाळून लावली आहे. या आदेशामुळे पुणे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. हा रस्ता करताना महापालिकेने योग्य प्रक्रियेचा अवलंब केला आहे, असे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने रस्त्याला हिरवा झेंडा दाखवला आहे. आता या काही रस्त्याचा काही भाग जमिनीवरून तर काही भाग हा उन्नतमार्ग (इलोव्हेटेड) असणार आहे. या उन्नत मार्गामुळे टेकडी फोडावी लागणार नाही असा दावा महापालिकेने केला आहे.
आपला परिसर संस्थेच्या वतीने निकाल लागल्यानंतर तातडीने पुणे महापालिका आयुक्त मा.डॉक्टर राजेंद्र भोसले यांना सविस्तर मागणीचे निवेदन दिले आहे यामध्ये पौड फाटा बालभारती रस्ता करण्याबाबत मुंबई हायकोर्ट यांचे आदेश PIL 14/2022 ची प्रत देऊन पौड फाटा बालभारती रस्ता तातडीने सुरू करण्यासंदर्भामध्ये योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. मेहरबान हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित होती परंतु मनाई आदेश नव्हता, राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावी हा रस्ता रखडला होता असे स्पष्ट सांगत या रस्त्याचा तयार डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) हा रस्ता व्हावा यासाठी आम्ही आग्रही असून पुणेकरांच्या हितासाठी संस्थेच्या वतीने सुप्रीम कोर्टात कॅव्हेटही दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची कल्पना देण्यात आली आहे. होतो.
पौड फाटा बालभारती या रस्त्याचे काम सुरू होणार होते परंतु काही राजकीय नेत्यांनी यात खोडा घातला आणि प्रशासनाने साथ दिली असल्यामुळेच फक्त मनाई आदेशावरती संपूर्ण प्रक्रिया थांबवण्याचा घाट प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. पुण्याची परिस्थिती वाहतुकीची परिस्थिती बिकट होत चालली आहे. पुणेकरांना हा रस्ता हवा आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय करून सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते पालकमंत्री अजितदादा पवार मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील माधुरीताई मिसाळ आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या रस्त्याचा शुभारंभ करावा ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे.












