तळवली पंचक्रोशी स्वयंभू चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत मुंढर वाघजाई संघाने द्वितीय क्रमांक पटकावला

0

गुहागर दि. १७ (रामदास धो. गमरे) भेलेवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्यदिव्य “तळवली स्वयंभू चषक २०२५” पंचक्रोशी व खुला गट क्रिकेट स्पर्धेमध्ये “वाघजाई मुंढर गाव” या क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरल्याने मुंढर ग्रामस्थांमध्ये हर्षोउल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वप्नील आग्रे व सिद्धेश मोहिते यांनी आपल्या शिरपेचात अनुक्रमे उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज म्हणून मानाचा तुरा रोवला, सदर रोमहर्षक सामन्यांत वाघजाई मूंढर टीममध्ये पोलिस पाटील किरण धनावडे, सागर सुर्वे, राजेश मोहिते, आदित्य शिर्के, ऋषभ शिर्के, पारस शिर्के, स्वप्नील आग्रे, स्वप्नील जाधव, सिद्धेश मोहिते, संजय आदावडे, सुजित गांधी, रसिक पाटणकर, सम्यक गमरे, पार्थ गमरे या खेळाडूंनी अतुलनीय कामगिरी केली सोबतच मैदानात आपल्या टीमच्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी अनिल अवेरे, वसंत दादा, मधुकर मोहिते, राकेश मोहिते, सुधीर गमरे या ग्रामस्थांनी आपल्या मुंढर गावाचा विजय होण्यासाठी मैदानात हजर राहून खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहित केले. सदर अटीतटीच्या सामन्यांत वाघजाई मुंढर गाव क्रिकेट संघाने दुसरा क्रमांक पटकवल्याबद्दल सर्व खेळाडूंचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन