धनंजय मुंडे यांची प्रॉपर्टी किती? करुणा मुंडे यांनी आकडाच सांगितला! राजश्री मुंडेंबाबत मोठा दावा

0

मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात गेलेल्या करुणा शर्मा यांना मोठे यश आलेले आहे. करुणा शर्मा यांनी केलेले आरोप वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने अंशतः मान्य केले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचे करुणा शर्मा यांनी स्वागत केले परंतु न्यायालयाच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नसल्याचे त्या म्हणाल्या.

मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारात दोषी आढळल्यानंतर करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. धनंजय मुंडे यांची करोडोंची संपत्ती आहे. परंतु त्यातील एक रुपयांची संपत्तीही माझ्या किंवा माझ्या मुलांच्या नावावर नाही, असे सांगत महिन्यांनी त्यांनी १५ लाख रुपये म्हणून पोटगी द्यावी, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली.

धनंजय मुंडे यांची प्रॉपर्टी किती?

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

धनंजय मुंडे यांची ५०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ६५ कोटी रुपये आहे. आधी राजश्री धनंजय मुंडे यांच्या नावावर संपत्ती नव्हती. पण जेव्हापासून माझे आणि धनंजय यांचे भांडण सुरू झाले, तेव्हा त्यांनी राजश्री यांच्या नावावर संपत्ती केली. राजश्री यांच्या नावावर संपत्ती करताना त्यांनी मला किंवा आमच्या मुलांना अजिबात विचारले नव्हते. आमच्या नावावर त्यांची एकही रुपयांची प्रॉपर्टी नाही, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

करुणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी माझ्याशी १९९८ साली लग्न केले. त्यानंतर त्यांनी राजश्री यांच्याशी लग्न केले. किंबहुना राजश्री मुंडे यांच्याबरोबर लग्न करताना माझी त्यांनी परवानगीही घेतली नव्हती. मी त्यावेळी इंदौरला होते. त्यांच्या दोघांच्या लग्नाला मी याआधीच न्यायालयात चॅलेंज केले आहे. अर्थात मी त्यांची पहिली पत्नी आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाही

धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे मी तक्रार दाखल केली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी आमदार राजीनामा द्यायला हवा, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त धनंजय मुंडे यांच्यावर पूर्वापार आहे, असा गंभीर आरोपही करुणा मुंडे यांनी केला.

वांद्रे न्यायालयाच्या निर्देशाविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार

प्रति महिना १५ लाख पोटगी मिळावी, अशी माझी मागणी होती परंतु न्यायालयाने दोन लाख पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. वांद्रे न्यायालयाच्या निर्देशाविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वाढीव पोटगी करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलीला वाटून देण्यात येणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

शपथपत्रात किती संपत्तीचा उल्लेख?

दुसरीकडे २०२४ विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले होते. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्याकडे ५३ कोटी ८० लाख रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले, हे नमूद करण्यासारखी बाब आहे.

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी काय स्पष्टीकरण दिलं?

कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा

धनंजय मुंडे यांनी काही चुकीचं केलंय असं कोर्टाला आढळलं नाही.

करुणा शर्मा यांच्यासोबत राहत होतो, हे धनंजय मुंडे यांनी आधीच मान्य केलंय हे ग्राह्य धरूनच कोर्टाने आजचे आदेश दिले आहेत