टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, कॅप्टन रोहित शर्माचा निर्णय काय?

0

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा डे-नाईट असणार आहे. या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील या दुसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार शुक्रवारी 6 डिसेंबरला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता अ‍ॅडलेड ओव्हल येथे टॉस करण्यात आला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत.

टीम इंडियात 3 बदल

टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये दुसऱ्या कसोटीसाठी 3 तर ऑस्ट्रेलियाने 1 बदल केला आहे. टीम इंडियात नियमित कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज शुबमन गिल आणि ऑलराउंडर आर अश्विन या तिघांचा कमबॅक झालं आहे. त्यामुळे देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांना बाहेर बसावं लागलं आहे. शुबमन गिल याच्या अनुपस्थित पहिल्या कसोटीत देवदत्त पडीक्कल याला तिसऱ्या स्थानी खेळण्याची संधी मिळाली होती. शुबमन गिलला दुखापतीमुळे सलामीच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. तर रोहित त्याचा मुलगा अहानच्या जन्मानंतर कुटुंबियासोबत वेळ घालवत असल्याने तो उपलब्ध नव्हता. मात्र आता रोहितही परतलाय. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये हे बदल करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

तर ऑस्ट्रेलियाने फक्त 1 बदल केला आहे. दुखापतग्रस्त जॉश हेझलवूड याच्या जागी स्कॉट बोलँड याचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने एकदिवस आधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली होती

टीम इंडिया आघाडीवर

दरम्यान टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाचा या अ‍ॅडलेड ओव्हलमध्ये ’36’ चा आकडा आहे. टीम इंडिया गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 2020-2021 मध्ये याच मैदानात 36 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाकडे या सामन्यात जिंकून गेल्या सामन्यातील पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकला

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीची ताकद आणखी वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरीचे पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.