खडकवासला विधानसभा मतदारसंघ गणित काही वेगळंच असंख्य अतृप्त इच्छुकांची गर्दी आणि वेगवेगळे प्रयोग करूनही कायम भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात राहिलेला खडकवासला विधानसभा मतदारसंघ! परंतु खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदा विधानसभेची संधी मिळाल्या नंतर पराभव नशिबी आलेल्या इच्छुकाने यंदा मात्र फासे काही औरच टाकले! (कधी इच्छा व्यक्त केली नाही परंतु पराभव वर्मी होता की भारतीय जनता पक्षामध्ये तीन जणांच्या बंडाला पाठबळ) परंतु पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर आपल्याला संधी मिळेल या आशेवरती असलेल्या तिन्ही उमेदवारांना वास्तव( पहिल्या निवडणुकीत पराभव, पक्षात प्रवेश नाही अन् पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही पराभूत उमेदवारास प्रबळ दावेदार) कळल्यानंतर आपला पुरेपूर वापर झाला आहे याची जाणीव झाली.






यंदा मात्र हमखास पहिले यादीत नाव येण्याची अपेक्षा असताना आणि प्रमुख मित्र पक्षातील इच्छुक, (महिला आयोग अध्यक्ष यांचेही पुनर्वसन) लिफाफ्या वेळी झालेला गोंधळ यामुळे उमेदवारी रखडली आणि अतृप्त सर्वच इच्छुकांना …ही संधी आहे याची झालेली जाणीव मग सुरू झाली जमवाजमव,रात्रीच्या बैठका अफवांचे पेव (व्हाट्सअप कॉलवर ‘जय भीम’च्या घोषणा) आणि त्यानंतर कायम जनाधार सांभाळत असलेल्या दोन उमेदवारांनी थेट मुंबई गाठली आणि एक एक से प्रश्न केला ….आमचं काय चुकलं! लागलीच समर्थनार्थ सर्व पदाधिकारी मुंबईमध्ये तंबू ठोकून बसले आणि पेच सुटण्याचे संकेत निर्माण झाले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात सलग तीन विजय मिळवल्यानंतर नवा प्रयोग करण्याचा पक्षश्रेष्ठींनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनेही अतोनात प्रयत्न केला. त्यामुळे अचानक सहा महिन्यांमध्ये खडकवासला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, माजी महापौर प्रसन्नदादा जगताप, हिंदुत्ववादी चेहरा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दीपक नागपुरे अशा सर्व इच्छुकांनी प्रयत्न करत खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरक्षित मतदारसंघ म्हणून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण खरी स्पर्धा सुरू झाली ती पहिल्या यादीत नाव न मिळाल्यानंतर आणि सर्वच इच्छुकांना हा संदेश आहे याचा आपण फायदा घेतला पाहिजे यासाठी संकेत मिळत गेले. खडकवासला मतदारसंघांमध्ये नवीन प्रयोग केला जाणार अशा चर्चा गेली तीन-चार दिवस रंगत होत्या; मुंबई दौरे आणि मुंबई मुक्काम हेही वाढले परंतु पक्षश्रेष्ठींनी एकच शब्द ठाम ठेवला …. शेवटी विजय महत्वाचा!
खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावरती विजय मिळवला असला तरी या मतदारसंघातील विजयाची गणिते विचारधारा अन जनसंपर्क यापेक्षाही प्रादेशिक गणिते आणि विरोधकांना हाताळण्याचं कौशल्य यावरतीच अवलंबून आहेत. आपला …विरोधक वरच्या पायरीवर नको ही खेकडा प्रवृत्ती! खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून तयार झाली आहे आणि या सर्वांचीच गणिते जुळवत विद्यमान आमदारांनी आजपर्यंत हॅट्रिक साध्य केली आणि पुन्हा पक्षाला या मतदारसंघांमध्ये विजयश्री खेचायचे असेल तर पक्षाकडे सक्षम पर्याय कोणता या विषयावरती सध्या चर्चा सुरू आहे. परंतु अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये नव्या प्रयोगास मित्र पक्षांकडूनही ‘नकार’ येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात नवा प्रयोग केल्यास ….निष्ठावानांनाच डावल्याचा संपूर्ण महाराष्ट्रात संदेश जाण्याची भीती तर आहेच परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळामध्ये जर कार्यकारिणीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर मित्र पक्षांची नाराजी घेऊन हा मतदारसंघ ताब्यात ठेवणे भारतीय जनता पक्षाला शक्य वाटत नसल्याने पुन्हा एकदा हॅट्रिक साध्य केलेल्या उमेदवारालाच संधी देण्याची चर्चा सध्या मुंबई दरबारी सुरू झाली असल्याची ही माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विरोधकांकडून पुन्हा त्याच उमेदवाराला संधी देण्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन नवा प्रयोग केल्यास अतितटीच्या लढतीत राखलेल्या मतदार संघावर ‘पाणी’ हेतू पुरस्कर सोडले असा संदेश ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात जाण्याची भीती लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठीकडून सावध पावले टाकली जात आहेत.












