खडकवासला समान ताकदीची ‘इच्छुकांची’ खुळखुळ बंदा रुपया कोण? ही कसोटी हॅट्रिक आमदारही ‘ॲक्टिव्ह’ मोडमध्ये

0

खडकवासला विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत सुरुवातीची 2 वर्षे (रमेश वांजळे)वगळता खडकवासला विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचे ताब्यात असला तरी सुमारे डझनभर इच्छुकांनी तयारी सुरुवात केल्यामुळे यंदा खडकवासला मतदारसंघांमध्ये समान ताकदीमुळे इच्छुकांचीचं खुळखुळ वाजत असून विजयी होण्यास बंदा रुपया कोण करणार ही खरी कसोटी आहे. हॅट्रिक आमदार भीमराव तापकीर यांनीही मैदानात शड्डू ठोकण्यास सुरुवात केली आहे. 2019ची तापकीर x दोडके ही लढत दुरंगी न राहता बहुरंगी होत असून इच्छुकांनी सुरू केलेली तयारी लक्षात घेता यंदा वेगळ्याच लढती रंगण्याचीही शक्यता आहे.

असून हॅट्रिक आमदार भीमराव तापकीर यांच्यासह सर्वच इच्छुकांनी सक्रिय होत यंदा आपणच विजयी अशी वल्गना करण्यास सुरुवात केली असल्याने या मतदारसंघांमध्ये खरंच कोणत्याही एका नेत्याचं वर्चस्व आहे का? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे याचे कारण म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये वाढलेल्या प्रचंड इच्छुकांची संख्या. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे भीमराव (आण्णा) धोंडीबा तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोडके सचिन यांचा निसटत्या 2595 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. हा भारतीय जनता पक्षाचा विजय की विरोधकांची एकी न होणे हा प्रश्न पाच वर्ष या मतदारसंघांमध्ये कायम चर्चेत राहिला आहे. खरे तर मतदारसंघाची संरचना झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या स्थानिक पातळीवरील यशाच्या जीवावर 3 वेळा वेगवेगळे उमेदवार रिंगणात उतरवत खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पदरी फक्त एकी न होणे या एकमेव कारणामुळे कायमच अपयश आले. महायुती सरकार निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रात खडकवासला विधानसभा मतदारसंघात अजब गजब (दोन तुल्यबळ विरोधक एकत्र) राजकीय समीकरण जुळल अन् एकी होण्यापेक्षा दावेदारीच वाढली आहे.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार? 

खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान हॅट्रिक आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, यांच्यासह भाजपमधूनच दिलीप वेडेपाटील, प्रसन्न जगताप यांनी दंड थोपटले. तर मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रूपाली चाकणकर यांच्याबरोबर बाबा धुमाळ, दिलीप बराटे, विकास नाना दांगट,  माजी महापौर दत्ता धनकवडे यांनीही विधानसभा निवडणूक लढण्याची व्यक्त केलेली इच्छा या सर्व कारणांमुळे सध्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात एक असं कोणत्याही नेतृत्व नजरेसमोर येत नाही की जे मतदार संघामध्ये सर्वदूर पोचले आहे. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी या मतदारसंघात हॅट्रिक मिळवली असली तरी कायम विरोधकांच्या मदतीनेच विजय मिळवला असा आरोप त्यांच्यावर होत असल्यामुळे त्यांनाही यावेळी अशाच वेगळ्या गणितांची समीकरणे जुळवावी लागतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा (एमपी) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार यांचा पराभव करून 158333 मतांच्या फरकाने विजय मिळवला. तरी खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये घटवलेलं 50000 चे मताधिक्य हा या मतदारसंघातील एक चर्चेचा विषय बनला आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थेट विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या पुतण्याचा पराभव केलेले किशोर(बाळा) धनकवडे व विद्यमान मतदार संघ अध्यक्ष काका चव्हाण यांचीही जोरदार तयारी सुरू झाली आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

पुणे शहराचे पश्चिम द्वार आणि मध्यमवर्गीय लोकांना सोयीस्कर भाग म्हणून खडकवासला पट्ट्यामध्ये दिवसेंदिवस लोक वस्ती वाढत आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात १३ प्रमुख भागामध्ये प्रामुख्याने वारजे, शिवणे, धायरी, बिबवेवाडी, कात्रज, बावधन खुर्द, नऱ्हे, धनकवडी, वडगाव बु., कोंढवे धावडे, नांदेड, किरकटवाडी, वडगाव खुर्द या भागात मतदार संख्या व केंद्र संख्येत वाढ झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पारंपारिक मतदार संघ असल्याचा दावा केला जात असला तरी वाढत असलेली लोकवस्ती ही विभिन्न विचाराची असल्याने या मतदारसंघावर आपली पकड मिळवण्यासाठी बिगर भाजपा पक्षांनीही या खडकवासला विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे.

सध्याच्या घडीला खडकवासला मतदारसंघाची 4 विभागांमध्ये संरचना वाढत असून यामध्ये प्रादेशिक नेतृत्वांनी उभारी घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांचं प्राबल्य असलेला धनकवडी, बिबवेवाडी, कात्रज समजला जात असला तरी या भागालगत असलेल्या वडगाव बु., धायरी, नांदेड, नऱ्हे, किरकटवाडी, वडगाव खुर्द(या पट्ट्यातूनच भाजपच्या वतीने माजी नगरसेवकांनी तयारी सुरू केली आहे) भागामध्ये नित्य संपर्क ठेवण्यामध्ये त्यांचा कल दिसतो. तर निसटता पराभव सहन केलेले सचिन दोडके हे कायम वारजे, शिवणे, कोंढवे धावडे परिसरात सक्रिय असतात. उर्वरित कोथरूड -बावधन खुर्द भागातही हॅट्रिक आमदारांची दोन स्तरावरती टीम असून (विजयी नगरसेवक x तरुण कार्यकर्त्यांची फळी) कार्यकर्त्यांना बळ देत विद्यमान आमदार भीमराव तापकीर काम करताना दिसून येत आहेत. या पट्ट्यातूनही भाजपच्या वतीने माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी तयारी सुरू केली आहे.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

एकंदरीत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा विचार करता सुमारे डझनभर बाहुबली इच्छुक अन् हॅट्रिक आमदारही एकसमान पातळीवरती मतांचा कोटा गाठत असल्यामुळे आगामी काळात खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये काटे की टक्कर होणार यामध्ये दुमत नाही. परंतु कायम विरोधकांच्या दुफळीचा फायदा घेत भाजपने या भागामध्ये विजय खेचला त्याची पुनरावृत्ती करत यंदा विरोधकही भारतीय जनता पक्षाचे इच्छुक अन्  अंतर्गत विरोधक वेगळी गणिते करते की काय ते पहावे लागेल.