महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे गटाच्या वतीने कामगार कल्याण भवन सहकारनगर , पुणे येथे मंगळवार दिनांक 9 जुलै 24 रोजी दुपारी एक वाजता समरगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर उद्घाटनप्रसंगी मा यशवंतभाऊ भोसले ,अध्यक्ष राष्ट्रीय श्रमिक आघाडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर उद्घाटनप्रसंगी मा. मनोज पाटील साहेब सहा. कल्याण आयुक्त ,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे विभाग , परीक्षक, मा. गुरुप्रसाद नानी वडेकर, मा. चंद्रकांत माने, मा. बाबासाहेब जाधव. इ मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे, मा. संदीप दिवेकर रिलेशन एच आर इंडस्ट्रीज ,रिलेशन क्रोमवेल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, विशेष उपस्थिती लोकशाहीर सदाशिव भिसे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दत्तात्रय कोहिनकर माईंड पावर ट्रेनर पुणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.






सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माननीय मनोज पाटीलसाहेब सहाय्यक कल्याण आयुक्त ,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे विभाग यांनी केले . सदर स्पर्धेमध्ये एकूण नऊ संघांनी सहभाग नोंदवला . प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र सणसवाडी प्रेरित कमिन्स इंडिया लि . संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघात कंपनीचे कर्मचारी उदय बेंडभर, तानाजी पाटील, सोमनाथ वाले, अजय डोंगरे, विष्णू मेमाणे, राजू फंड, रमेश बारवे, मनोज खटावकर, सुनील हिंगे, तसेच गुणवंत कामगार संजय गोळे आणि कामगार भूषण राजेंद्र वाघ यांनी सहभाग घेतला.किर्लोस्कर कमिन्स युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर यांनी सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सर्व संघाला शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत व्दितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर यांना मिळाला तर तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र पिंपरी यांना मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील बोरावडे ,केंद्र संचालक यांनी केले. आभार प्रदर्शन संदीप गावडे कल्याण निरीक्षक यांनी केले.










