मुख्यमंत्री शिंदेंचा जागेवर यु-टर्न अन् लोटांगण?; शिंदें इतकेच फडणवीसही लोकप्रियची सारवासारव!

0

शिवसेना-भाजप युतीची झळकलेली जाहिरात अनेक वृत्तपत्रांची ‘हेडलाईन’ झाली. या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली होती. या जाहीरातीवरुन विरोधकांना टीका करण्यासाठी आयत कोलीत मिळाल होत. आज (बुधवारी) शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सारवासारव करण्यात येत आहे. ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेनं (शिंदे गट) वर्तमान पत्रांमध्ये छापून आणली. या जाहिरातीवरून वाद झाला होता. त्यानंतर आता भाजप-शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पहिल्या जाहिरातीवर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर जाहिरातीतली चूक दुरुस्त करण्यात आली आहे. बुधवारी पुन्हा नव्यानं जाहिराती दिली आहेत. या नव्या जाहिरातीमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकतो आहे. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची साथ दिली आहे, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या साथीनं विकासाचे पर्व महाराष्ट्रात आलं आहे, असं सांगितलं आहे. पहिल्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, तो दुरुस्त नव्या जाहीरातीत दुरुस्त करण्यात आला आहे. जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच असा दावा सुद्धा जाहिरातून करण्यात आला आहे. तर ४९.३० टक्के जनतेचा शिंदे-भाजप सरकारला आर्शिर्वाद आहे, असंही या जाहिरातीत म्हटलं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

ही जाहिरात दिलेलीच नव्हती ..

काल प्रकाशित झालेल्या जाहिरातीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपण ही जाहिरात दिलेलीच नव्हती अशी भूमिका घेतली. कोल्हापूर मधल्या जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं. एक प्रकारे आज केलेली चुकीची दुरुस्ती ही एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दबावासमोर माघार घेतल्याचं दिसत आहे.

कालच्या जाहीरातीत काय होते?

काल शिवसेनेकडून (शिंदे गट) महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. ‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्लेख जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधून नाराजीचा सूर आवळला होता.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार