उद्धव ठाकरे एवढ्या जागांवर ठाम, मविआला फुटणार घाम; बैठकीतली मोठी बातमी फुटली!

0

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा दारूण पराभव केल्यानंतर देशभरातल्या विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कर्नाटकच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी राज्यात महाविकासआघाडीची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीचे मुख्य नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली, पण यावरून महाविकासआघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते, त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना 20 जागांवर लढवण्यावर ठाम असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या 48 जागांच्या वाटपाबाबत चर्चा झाली, अशी माहिती मविआच्या नेत्यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही नेते लोकसभा निवडणुकीत तीनही पक्ष समसमान म्हणजेच प्रत्येकी 16 जागांवर लढतील, अशी चर्चा झाल्याची माहिती पसरवत आहेत. पण वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 निवडून आलेल्या 18 जागा आणि 2 अतिरिक्त जागांवर शिवसेनेचे सर्वोच्च नेते ठाम असल्याचं सांगण्यात आलंय.

रविवारी झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीमध्ये स्वत: उद्धव ठाकरे यांनी समसमान जागांच्या चर्चेला विरोध केला होता, त्यामुळे सध्या महाविकासआघाडीमध्ये लोकसभेच्या समसमान जागांच्या चर्चेला सुरूंग लागला आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!