कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातलं सरकार वाचलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात कायम राहिल्याने आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरातूनही अनेक जण यासाठी इच्छुक आहेत. मात्र शिंदेच्या ऐवजी कोल्हापुरात भाजपला मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विनय कोरे हे याचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत काहीशी अस्वस्थता आहे.






शिंदे फडणवीस सरकार राज्यात कायम राहिल्याने आता मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी देव पाण्यात घातले आहेत. कोल्हापुरातून शिंदेच्या बंडात सामील झालेले प्रकाश अबीटकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या या निमित्ताने अपेक्षा पुन्हा जागृत झाल्या आहेत. यड्रावकर हे राज्यमंत्री असतानाच शिंदे गटात सामील झाले होते, त्यामुळे त्यांच्याकडून मंत्री पदावर दावा केला जात आहे.











