जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली, आंदोलकांचा टॉलस्टॉय मार्गावर जमाव मध्यरात्री दगडफेक अन् आंदोलकांवर पुन्हा जुलमी लाठीचार्ज

0

नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर इथं कॉक्रोच पार्टीचं आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरात संतापाची लाट उसळली.एकीकडे विरोधक आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे तर दुसरीकडे, जंतरमंतरवर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जंतरमंतर इथं कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके उपोषण करत आहे. पण, २२ जुलैच्या रात्री अचानक आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण मिळालं जंतर-मंतरवर जमलेला आंदोलकांचा जमाव पुढे टॉलस्टॉय मार्गावर पोहोचला. यावेळी आंदोलकांनी पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) च्या जवानांवर दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप केला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दगडफेक होत आहे तर दुसरीकडे, पोलीस हे तरुणांवर लाठीचार्ज करत आहे. यामध्ये काही तरुणांनी पोलिसांवर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलीस आणि RAF ने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सध्या टॉलस्टॉय मार्गावरील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.