नगरसेवकांची चिंता आणि महापौरांच्या पोटतिडकीनंतर सुरक्षा रक्षक सक्षम बनवण्याचे आयुक्तांचे धोरण स्वागतार्ह : माजी विरोधी पक्षनेते केसकर

0

पुणे महापालिकेच्या निर्वाचित नगरसेवकांनी पुणे महापालिका परिसरातील सुरक्षेविषयी व्यक्त केलेली चिंता आणि माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे यांनी फार पोटतिडकीने गंभीर चिंता व्यक्त केल्यानंतर पुणे महापालिका आयुक्त यांनी मनसोक्तपणे सुरक्षा विषयक बदल करण्याच्या करण्याचे धोरण अवलंबले असल्याबाबत माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी स्वागत करण्यात आले. सुरक्षा कर्मचारी टेंडर मध्ये खूप घोळ, गोंधळ आणि आवडीच्या ठेकेदाराला बसवण्यासाठी खूप कसरती चालू असतात अन् आहेत प्रशासन आणि पुणेकर हे बघत आहे.

पुणे महापालिकेमध्ये या अगोदर सुरक्षा बाबतीत असंख्य घडामोडी घडलेल्या आहेत जसे की, “काम मुंबईत आणि बिल पुण्यामध्ये असाही एक ठेकेदार होता, आता तो आहे का नाही, माहिती नाही पण दंड केले नाही ती रक्कम फक्त वसूल करून मोकळीक दिली “क्लीनचिट”! तुम्हाला मोकळीक दिली तर पोलीस दलासारखे सक्षम सुरक्षा रक्षक तुम्ही निर्माण करू शकणार हा जो वादा, दावा तुम्ही मुख्य सभेमध्ये केला त्याचे आम्ही स्वागत करतो. आणि या सुरक्षारक्षक भरतीसाठी कोणकोण दबाव आणतं, का आणतं आणि तो दबाव प्रशासन का सहन करत या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळणे आवश्यक असल्याची भूमिका माजी विरोधी पक्षनेते केसकर यांच्या वतीने घेण्यात आली आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

नुकतेच आपण महापालिका आयुक्त या नात्याने प्रशासकीय स्तरावरील एका कर्मचाऱ्यांला आपणावर दबाव आणला त्याला आपण बडतर्फ केले ते योग्यच होते तसेच प्रत्येक बदलीच्या ऑर्डरमध्ये प्रशासनाच्या वतीने हे लिहिलेले असते की राजकीय दबाव आणला तर शिस्तभंगाची कारवाई करू लिखित नियम सुद्धा आपल्यामुळे अस्तित्वात आल्याची जाणीव पुणे महापालिका प्रशासनाला झाली आहे. जो काही राजकीय, प्रशासकीय दबाव असेल तो तुम्हाला जाहीर करायचा नसला तरी तो दूर करा आणि सुरक्षा रक्षक हे सक्षम बनवा पुणे महानगरपालिकेच्या प्रतिमेवर याचा परिणाम होतो ही बाब गंभीर आहे.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

एक निपक्ष कार्यक्षम आणि शहराचा हिताचा विचार करणारे आयुक्त म्हणून आम्ही आपणाकडे बघतो. आपण या संदर्भामध्ये तातडीने पावले उचलून दबाव आणणाऱ्यांची नावे दबावामुळे नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता आणि पोलीस दलासारखे कार्यक्षम सुरक्षारक्षक तयार करणे याला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे कृती करावी ही विनंती उज्ज्वल केसकर माजी विरोधी पक्षनेते पुणे मनपा, सुहास कुलकर्णी माजी विरोधी पक्षनेते, प्रशांत बधे माजी नगरसेवक यांच्याा वतीने लेखी निवेदनातून करण्यात आली आहे.