स्पेनची फुटबॉल वर्ल्ड कप फायनलमध्ये गतविजेत्या अर्जेंटिनावर 1-0ने मात, गोल्डन बूटचा एम्बापे मानकरी

0

फेरान टोरेसने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने फुटबॉल वर्ल्ड कप २०२६च्या अंतिम लढतीत गतविजेत्या अर्जेंटिनाला १-० असे हरवले आणि विजेतेपद पटकावले. यासह स्पेनने पुन्हा एकदा युरो कपपाठोपाठ वर्ल्ड कप उंचावण्याची कामगिरी केली. यापूर्वी, त्यांनी २००८मध्ये युरो कप जिंकला होता, त्यापाठोपाठ २०१०मध्ये वर्ल्ड कप उंचवला होता. या वेळी त्यांनी २०२४मध्ये युरो कप जिंकला होता, त्यापाठोपाठ आता वर्ल्ड कपही उंचावला. जागतिक क्रमवारीत अर्जेंटिना पहिल्या, तर स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे संघ आतापर्यंत चौदा वेळा आमनेसामने आले होते. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी सहा लढती जिंकल्या होत्या, तर दोन लढती ‘ड्रॉ’ झाल्या. स्पेनने सातत्याने आक्रमक चाली रचल्या.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

यमाल, ॲलेक्स बाएना, फेरान टोरेस, पेड्री यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने अप्रतिमरित्या त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. मात्र, अखेरीस अतिरिक्त वेळेतीतल ब्रेकनंतर पुढच्याच मिनिटाला निको विल्यम्सच्या पासवर फेरान टोरेसने (१०६ मि.) जबरदस्त गोल नोंदवला आणि स्पेनच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यासह मेस्सीचे सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचे स्वप्न भंगले.

किलियन एम्बापे गोल्डन बूटचा मानकरी

फ्रान्सचा किलियन एम्बापे सलग दुसऱ्यांदा ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरला. त्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दहा गोल नोंदवले; तसेच चार गोलमध्ये त्याने साह्य केले. लिओनेल मेस्सी आणि एम्बापे यांच्यात ‘गोल्डन बूट’साठी चुरस होती. मेस्सी आणि एम्बापे यांचे प्रत्येकी आठ गोल होते. मात्र, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या लढतीत एम्बापेने दोन गोल नोंदवले आणि मेस्सीला मागे टाकले. गेल्या वर्ल्ड कपमध्ये एम्बापेने आठ गोल नोंदवून हा मान मिळवला होता.

अधिक वाचा  बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मालमत्ता जप्तीचा आदेशही रद्द; नियमित कायदेशीर व्यवहार म्हणजे ‘किकबॅक’ नव्हे

स्पेनने या सामन्यात निर्धारित तसेच जादा वेळेत गोलसाठी एकूण २० प्रयत्न केले. त्यातील १२ ऑन टार्गेट होते. मार्टिनेझच्या भक्कम गोलरक्षणामुळे स्पेनला वर्चस्वाचे गोलात रूपांतर करण्यासाठी जादा वेळेतील उत्तरार्धापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. लिओनेल मेस्सीसारखा अनुभवी खेळाडू असूनही अर्जेटिनाला गोलसाठी एकही प्रभावी प्रयत्न करता आला नाही.

ही आहे आकडेवारी…

२ – स्पेनने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावला.

(यापूर्वी, स्पेनने २०१०मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.)

४ – अर्जेंटिनाला चौथ्यांदा (१९३०, १९९०, २०१४, २०२६) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले