पुणे HCMTR प्रकल्प मार्गी मुख्यमंत्र्यांचे आभार परंतु आरंभ पौडफाटा ते बालभारती असा करावा: केसकर

0

पुणे शहरामध्ये HCMTR प्रकल्प राजकीय इच्छा शक्तीच्या अभावी अनेक वर्ष रखडलेला असतानाच विकासाचे धोरण अंगीकृत करून राज्य कारभार करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला परवानगी देऊन पुणेकरांसाठी खूप मोठा निर्णय घेण्याचे काम केले असून यामुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होणार आहे. पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पौड फाटा ते बालभारती हा उन्नत मार्ग सुद्धा याच प्रकल्पाच्या अंतर्गत येत असून या भागातील भूसंपादनाचे पूर्ण काम झालेले असल्याने शुभारंभ या भागातून करावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी केली आहे.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याची भविष्यकालीन संरचना लक्षात घेऊन अनेक प्रकारचे प्रकल्प राबविण्याचे धोरण अंगीकृत केले आहे. पुण्याची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रस्त्याचे नेटवर्क यासाठी प्राधान्य दिले. पुणे शहरालगत रिंग रोड असो किंवा अन्य भुयारी मार्ग व उड्डाणपूल असे असंख्य प्रकल्प कार्यान्वित करत असतानाच पुणे शहरातील अनेक वर्ष रखडलेला HCMTR प्रकल्प मार्गी लागल्याने सर्वसामान्य पुणेकरांसाठी ही आनंदाचीच बाब आहे. त्यातच पुण्यातील दैनंदिन वाहतूक समस्येला आळा घालण्यासाठी एका समितीची स्थापना केली. विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही समिती कार्यान्वित झाली असून आगामी काळात HCMTR प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर त्याचा वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यास रामबाण उपाय म्हणून वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

संपूर्ण पुणे शहरामध्ये HCMTR प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या आखणीमध्ये पौड फाटा बालभारती रस्त्याची आखणी देखील आहे. अन्य ठिकाणच्या भूसंपादनापेक्षा या भागातील भूसंपादन प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. बहुसंख्य जागा सरकारी मालकीची आहे अनेक ठिकाणी रस्ते झालेले आहेत टीडीआर देऊन असंख्य जागा देखील पुणे महापालिकेच्या वतीने ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याचे सुतवाच केले. आता हा HCMTR प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने या रस्त्याचे काम सुरू करताना प्राधान्याने बालभारती रस्ता ते पौड फाटा या ठिकाणी प्रारंभ केल्यास सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने हा बहुपर्यायी रस्त्याचे काम तातडीने सुरू करता येऊ शकते. त्यामुळे पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या पर्यायाचा विचार करावा अशी विनंती उज्ज्वल केसकर माजी विरोधी पक्षनेते, सुहास कुलकर्णी माजी विरोधी पक्षनेते  व प्रशांत बधे माजी नगरसेवक यांच्यावतीने करण्यात येत आहे.

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?