खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0

खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रात अति पर्जन्यमान झाल्याने आज पहाटे ३:४५ वाजता धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात १४,३९३ क्युसेक विसर्ग वाढवून २७,८८० क्युसेक करण्यात आला आहे. पुणे शहर व परिसरातील नागरिकांनी अत्यंत दक्षता बाळगावी, विशेषतः नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. सध्या धरणात पाणी साठा वाढत असल्याने येत्या काही दिवसांत विसर्गात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापौरांकडून पहाटे पाहणी

मुठा नदीत विसर्ग वाढल्याने एकता नगरी एका सोसायटीत पाणी घुसले.शिवणे भागातही काही घरात पाणी घुसले आहे. भीमनगर परिसर, तसेच कोंढवे धावडे परिसरातील अनेक घरात पाणी शिरले आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पहाटेपासून शहरातील नदीकाठच्या भागात पाहणी केली. राजपूत झोपडपट्टी, पुलाचीवाडी, एकता नगरी, निंबजनगर भागात पाहणी केली. यामुळे नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले आहे.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य 

कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याची शक्यता आहे. यामुळे मुठा नदीपात्रात अचानक पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

धरण प्राधिकरणाने सर्व नागरिकांना कडक इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात जनावरे, शेतीमाल किंवा इतर साहित्य असल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे. सखल भागातील रहिवाशांना तातडीने सूचना देऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.८ जुलै २०२६ रोजी

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या विसर्गाचा तपशील

रात्री १२.०० ते १.०० : ८४२ क्युसेक

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

रात्री १.०० ते १.३० : १,६८४ क्युसेक

रात्री १.३० ते २.३० : ३,४२४ क्युसेक

रात्री २.३० ते ३.१५ : ६,६३४ क्युसेक

रात्री ३.१५ ते ३.४५ : १४,३९३ क्युसेक

रात्री ३.४५ ते पहाटे ५.३० : २२,८८० क्युसेक

पहाटे ५.३० पासून सध्या : २७,२०३ क्युसेक