महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला ! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

0

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, कोकण आणि घाटमाथा भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने ६ जुलै २०२६ रोजी राज्यातील विविध भागांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव कायम राहणार आहे.रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीची शक्यता आहे.पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग – ऑरेंज अलर्ट, मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता. आहे. या भागात नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजले आहेत.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर रेड अलर्ट

पुणे शहरात पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून पुणे सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूर घाटमाथा – ऑरेंज अलर्ट. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर – हलका ते मध्यम पावसाची शक्यता.

उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस

नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट केला असून जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिल्ह्यात मुसळधार के अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा – रेड अलर्ट, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर – वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज.

अधिक वाचा  एकनाथ शिंदेंचं 500 कोटींच्या बॉम्बवरुन जरांगेंना प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

मराठवाड्यात यलो अलर्ट

छत्रपती संभाजीनगर – विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस, यलो अलर्ट.जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव – काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता.हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, डोंगराळ भागात जाणे टाळण्याचे आणि नदीकाठच्या भागात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.