वनाज ते चांदणी चौक महामेट्रो प्रकल्प केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक

0

पुण्याचे पश्चिमद्वार चांदणी चौक ते वनाज नव्याने सुरू होणाऱ्या महामेट्रो प्रकल्पाबाबत मा. ना. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री (हवाई उड्डाण व सहकारिता) यांच्या नेतृत्वाखाली तसेच नगरसेविका सौ. अल्पनाताई वरपे, दिलीप वेडेपाटील, किरण दगडेपाटील सौ.रूपालीताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवाजीनगर येथील मेट्रो भवन येथे वनाज ते चांदणी चौक महामेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस पुणे महापालिकेचे आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, श्री. अतुल गाडगीळ, श्री. निलेश कोंढाळकर, ॲड गणेश वरपे, कोथरूड सिटिझन फोरमचे श्री. प्रशांत कनोजिया, श्री. निलेश सैंदाने, श्री. विशाल अट्टल, श्री. अमित बोत्रे, श्री. राहुल चव्हाण तसेच पुणे महानगरपालिका व महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

बैठकीमध्ये वनाज ते चांदणी चौक मेट्रो विस्तार प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या प्रगतीतील तांत्रिक व प्रशासकीय बाबी व त्रुटी बाबत चर्चा करून कामाला गती देण्यासाठी आवश्यक सूचना करण्यात आल्या. कोथरूड, बावधन व परिसरातील नागरिकांच्या वाढत्या वाहतूक समस्यांचा तसेच मेट्रो स्टेशनची जागा व उड्डाणपुलाबाबत केलेल्या मागण्यांचा विचार करून वनाज ते चांदणी चौक मेट्रो विस्तार प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे  सौ. अल्पना गणेश वरपे नगरसेविका, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती, पुणे महानगरपालिका यांनी सांगितले.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?