सुनेत्रावहिनी पक्षातील भाकरी फिरवणार रिप्लेसमेंटही सापडली, युवक, महिला, विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी यांची होणार नियुक्ती?

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झालीय. ही बैठक मुंबईतील ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी झाली. या बैठकीत पक्षातील रिक्त पदे भरण्याबाबत आणि काही महत्त्वाच्या पदांवर फेरनियुक्त्या करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी निवडणुका आणि पक्षसंघटन बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या खलबतांना पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव

यानुसार महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे, युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या संघटनात्मक बदलांमुळे पक्षाला नवीन बळ मिळण्याची शक्यता आहे.