सृष्टी फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५१ देशी वृक्षांची लागवड

0

भांडारकर संस्था येथे सृष्टी फाउंडेशनच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सुमारे ५१ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. सृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप मोकाटे यांनी सांगितले की, गेल्या ९ वर्षांपासून सृष्टी फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण तसेच वृक्षांच्या जतनाचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमावेळी सृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप मोकाटे, नगरसेवक रवी साळेगांवकर, डॉ. मदन कोठुळे, गणेश बगाडे, विजय डाकले, जयदीप पडवळ, उमेश भेलके, चेतन भालेकर, अजय भुवड, अनिल बिडलान, धनेश हगवणे, अतुल राजूरकर, किरण उभे, विशाल भेलके, प्रणव मोकाटे, प्रशांत पवार, स्वराज पवार, गौरव कांबळे व प्रसाद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. सृष्टी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे परिसरात हरित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.