जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोपीनाथ नगर येथे वृक्षारोपण मोहीम उत्साहात संपन्न

0

पुणे, दि. ०५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी कोथरूड मध्य मंडल आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोपीनाथ नगर, कोथरूड येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम श्वेता अमित तोरडमल व अमित शरद तोरडमल यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला.

पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि नागरिकांमध्ये वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” हा संदेश देत उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

या कार्यक्रमास राज्यसभा खासदार मेधा ताई कुलकर्णी कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुहास जाधव, नगरसेवक दिनेश माथवड, निलेश कोंढाळकर, ज्योत्सना ताई कुलकर्णी, अल्पना ताई वरपे, मनीषा ताई बुटाला, रुपाली ताई पवार, गणेश वरपे, स्वप्निल राजीवाडे, सचिन मोकाटे, गिरीश खत्री, राम धुमाळ, नितीन शिंदे, दीपक पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच समाजामध्ये हरित विचारांची जाणीव निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!