सुतारदरा वीज समस्या सुटणार; नगरसेविका मनिषा बुटालांच्या प्रयत्नामुळे ३१५ केव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार ना. चंद्रकांतदादांचे हे निर्देश

0

कोथरुड : कोथरुडमधील सुतारदरा भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची प्रलंबित समस्या आता लवकरच निकाली निघणार आहे. या भागातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी ३१५ केव्हीए (KVA) क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या निवासस्थानी आज शहर अभियंता आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीला महापालिकेचे मुख्य शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महावितरणच्या कोथरुड विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विष्णू माने, हितेंद्र भिरूड, रोहन बिल्डर्सचे प्रतिनिधी ॲड. सावनकुमार कानडे, भाजप कोथरुड मंडल दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार

कोथरुडमध्ये उभ्या राहत असलेल्या नवीन मोठ्या सोसायट्या आणि इमारतींमुळे अनेक भागांतील विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जुन्या ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येऊन जुन्या वस्त्यांमध्ये व्होल्टेज कमी-जास्त होणे, तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. सुतारदरा परिसरातही गेल्या काही काळापासून नागरिकांना अशाच गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सुतारदरा, शिवतीर्थनगर, पेठकर साम्राज्य आदी भागातील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी महावितरणने नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्याचा निश्चित केले आहे. मात्र, प्रस्तावित जागा खासगी विकासकाच्या ताब्यात असल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे सदर विषयावर मार्ग काढण्यासाठी आणि महावितरणला तातडीने जागा उपलब्ध व्हावी, यासाठी ना. पाटील यांची आज उच्चस्तरिय बैठक घेतली.

अधिक वाचा  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!

या बैठकीत ना. पाटील यांनी मुख्य शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना विकासकाचे म्हणणे जाणून घेऊन तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात, आणि जागा महावितरणला उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच, महावितरणच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रक्रिया प्राधान्याने आणि जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर सुतारदरा आणि परिसरातील विजेवरील ताण कमी होणार असून, वारंवार होणारे ट्रिपिंग आणि भारनियमनाच्या समस्येतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महावितरणने या कामाचे नियोजन तातडीने सुरू केले असून, लवकरच काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज