नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; आतापर्यंत ११ जणांच्या मुसक्या आवळल्या, आरोपींची यादी समोर

0

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने कारवाईचा धडा लावला आहे. सीबीआयने आतापर्यंत ११ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.पोलिसांनी महाराष्ट्रात पुणे, नाशिक, पुण्यात मोठी कारवाई केली. या प्रकरणी महाराष्ट्राबाहेर जयपूरमध्येही कारवाई केली आहे.

सीबीआयने आज शुक्रवार पुण्यात आणखी एकावर कारवाई केली. सीबीआयने मनीषा हवालदारला अटक केली आहे. या कारवाईनंतर सेठ हरिलाल सराफ प्रशाळेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या हवालदार हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्या प्रसारिणी सभेच्या व्यवस्थापकीय बैठकीनंतर मनिषा हवालदारचे निलंबन करण्यात आलंय. मनिषा हवालदारने केलेल्या गैरकृत्याचा शालेय व्यवस्थापनाकडून निषेध करण्यात आलाय.

आतापर्यंत कोणाकोणाला अटक केली?

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य 

नीट पेपर फुटी प्रकरणात आतपर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने आत्तापर्यंत या प्रकरणात ११ जणांना अटक केली आहे. मनिषा वाघमारे, मनिषा मांढरे आणि मनिषा हवालदार या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. एकूण ११ पैकी ४ जणांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

पेपर फुटी प्रकरणात आत्तापर्यंत सीबीआयने अटक केलेले आरोपी

  • पी. व्ही. कुलकर्णी: पुणे
  • मनीषा वाघमारे: पुणे
  • मनिषा मांढरे: दिल्ली
  • शुभम खैरनार: नाशिक
  • धनंजय लोखंडे: अहिल्यानगर
  • यश यादव: गुरुग्राम
  • मांगीलाल बिवाल: जयपूर
  • विकास बिवाल: जयपूर
  • दिनेश बिवाल: जयपूर
  • डॉ. राहुल शिरुरे: पुणे
  • मनिषा हवालदार: पुणे
अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार