बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने ८५ वा वर्धापन दिन आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या ९१ व्या स्मृतिदिनाचे आयोजन

0

मुंबई: दि. २१ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती केंद्रीय कार्यालय यांच्या वतीने ८५ वा वर्धापन दिन सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता व महासुर्याची सावली, कोट्यवधीची माऊली, त्यागमूर्ती माता रमाई याचा ९१ वा स्मृतिदिन बुधवार २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई १२ येथे बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अधिपत्याखाली आयोजन करण्यात आले आहे.

सदर दोन्ही कार्यक्रमास प्रमुख वक्ते उपसभापती विनोद मोरे, कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, बौद्धजन पंचायत समिती सहकारी पतपेढीचे अध्यक्ष व विश्वस्त किशोर मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, व्यवस्थापन मंडळ, मध्यवर्ती कमिटी, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणार आहेत.

अधिक वाचा  विजयादशमीला कोथरूडकरांना मराठी ‘रामलीला’ आणि भव्य ‘रावणदहन’ची पर्वणी; ‘कथा शौर्याची माझ्या श्रीरामाची’ नाट्यप्रयोगालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

तरी दोन्ही दिवस आयोजित केलेल्या कार्यक्रमास सर्व व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, मध्यवर्ती महिला मंडळ, विविध समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शाखांचे कार्यकर्ते, संस्कार समितीचे सर्व उपासक, उपासिका, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात सरचिटणीस राजेश घाडगे यांनी केले आहे.