पुणे ‘विधान परिषद’ अर्धा डझन आमदारांना पुन्हा प्रवाहात येण्याची ‘लाईफलाईन’ की नवा चेहरा?; चर्चेत नसलेली ‘धक्कादायक’ नावे समोर

0

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची १ जूनपर्यंत मुदत असून, १८ जूनला मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ सर्वाधिक असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. पण दौंड नगरपालिकेतील नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की भाजप खेचून आणणार याकडे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीची खरी रंगत पक्षांतर्गत आणि महायुतीमधील शह-काटशहाच्या राजकारणात दडली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या ‘माजी’ आमदारांना विधानपरिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसनाची नामी संधी दिसू लागली आहे. पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ही निवडणूक ‘लाईफलाईन’ वाटत आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील पराभूत दिग्गजांनी या जागेवर डोळा ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढण्यासाठी दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे हे माजी आमदार इच्छुक आहेत. याशिवाय अजित गव्हाणे, रणजित शिवतारे, दीपक मानकर यांचीही नावे चर्चेत आहेत. कदाचित सुनेत्रा पवार यांच्याकडून धक्कातंत्राचा वापर करून चर्चेत नसलेले नावही समोर येऊ शकते, तर भाजपमध्ये संग्राम थोपटे, संजय जगताप, गणेश बिडकर, यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

असे आहे पक्षीय बलाबल :

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जागेसाठी एकूण ८२७ सदस्यांचे मतदान (महायुती ७३४)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष – ३४७

भाजप -३१९

शिवसेना – ६८ असे महायुतीचे एकूण सदस्य

महाविकास आघाडी ४७

उद्धव ठाकरेंची शिवसेना ११

काँग्रेस १९

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस १७

त्याशिवाय

अपक्ष २३, स्थानिक आघाडीचे २३ सदस्य आहेत

नगरपालिकेत संख्याबळ ३९४

(बारामती, इंदापूर आणि जुन्नर, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ, चाकण, राजगुरूनगर, मंचर, देहू, आळंदी, दौंड, खेड आणि हवेली, जेजुरी, भोर सासवड आणि शिरूर)

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २१९,

भाजप ९०,

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ५५,

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

काँग्रेस ४,

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)११,

बसप १, रासप १, स्थानिक आघाडी २४, अपक्ष २७

पुणे जिल्ह्यातील झेडपी व पंचायत समिती

पुणे जिल्हा परिषदेत

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५१,

भाजप १०,

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)०६,

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ०५,

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)०१ ,

एकूण ७३ सदस्य आहेत.

(पुणे जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य निवड झालेली नाही)

पंचायत समितीच्या सभापतीला मतदानाचा अधिकार

पुणे जिल्ह्यात १३ पंचायत समित्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ११ ठिकाणी भाजपचे 2 ठिकाणी सभापती आहेत.

पुणे महानगरपालिका पक्षनिहाय संख्याबळ

पुणे महापालिका भाजप (BJP) ११९,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष २३, काँग्रेस १२, एकनाथ शिंदे शिवसेना ०७, उद्धव ठाकरे शिवसेना ०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ०२ असे एकूण १६८ सदस्य आहेत. तर १० स्वीकृत सदस्य असून त्यामध्ये भाजप ७, राष्ट्रवादी २ तर काँग्रेसचा एक सदस्य आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

पिंपरी-चिंचवड महापालिका पक्षनिहाय संख्याबळ

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप ८४, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ३६, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ०२, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ०३, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ०१ असे एकूण १२८ सदस्य आहेत. तर १० स्वीकृत सदस्य असून त्यामध्ये भाजप ७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ३ सदस्य आहेत.

दौंडमधील नागरी हित संरक्षण मंडळाच्या १७ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे भाजपचे एकूण संख्याबळ ३३६ होत असले तरी ते राष्ट्रवादीपेक्षा अकराने कमीच आहे. गेल्या दोन टर्म या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले आमदार होते. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचा नैसर्गिक दावा आहे. मात्र, महापालिकेत वाढलेले वर्चस्व पाहता भाजप ही जागा खेचून आणण्यासाठी उत्सुक आहे. जर दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आणि मैत्रीपूर्ण लढत झाली, तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ होण्याची दाट शक्यता आहे.