पुणे महापालिकेत उपायुक्तांचा मोठा खांदेपालट; लॉबिंग करणारे अधिकारी साइड ट्रॅक, नव्या अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची खाती

0

पुणे महापालिकेत उपायुक्तांच्या बदल्यांचा मोठा ‘खांदेपालट’ करण्यात आला आहे. महत्त्वाची आणि मलईदार खाती मिळवण्यासाठी राजकीय लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाजूला सारून आयुक्तांनी प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारला आहे. दक्षता, आकाशचिन्ह, सामान्य प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांसह अन्य ठिकाणच्या बदल्या केल्या आहेत.

सर्वाधिक चर्चेत आणि वादात सापडलेला आकाशचिन्ह विभाग माधव जगताप यांच्याकडून काढून तो संदीप कदम यांच्याकडे दिला आहे . प्रशासनावर लक्ष ठेवणाऱ्या दक्षता विभागाची जबाबदारी आता प्रसाद काटकर (प्रभारी) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या विभागाची सूत्रे आता किशोरी शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत. सांस्कृतिक व क्रीडा विभाग हा उपायुक्त डॉ. संतोष टेंगले यांच्याकडे दिला आहे.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

अन्य खात्यात ही बदल करण्यात आला आहे. अतिक्रमण निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मिळकतकर या विभागात कोणतेही बदल नाहीत. दरम्यान महत्वाचे खाते मिळावेत यासाठी काही उपायुक्त लाॅबिग करत होते. त्यांना कमी महत्त्वाचे खाते दिले आहेत.