वैभवची तुफानी खेळी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड ब्रेक; 10 सिक्स-7 फोर, गेलचा हा विक्रमही टप्प्यात वैभवला फक्तं 7 षटकारांची गरज

0

राजस्थान रॉयल्सचा युवा आणि सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने मंगळवारी 19 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 64 व्या सामन्यात ट्रेडमार्क खेळी केली. वैभवने लखनौ विरुद्ध 221 धावांचा पाठलाग करताना चाबूक खेळी केली. वैभवची नेहमीपेक्षा संथ सुरुवात झाली. मात्र त्यानंतर वैभवने गिअर बदलला. वैभवने 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं. वैभवचं आयपीएल कारकीर्दीतील हे सर्वात संथ अर्धशतक ठरलं. त्यानंतर वैभवने आणखी वेगात धावा केल्या. त्यामुळे वैभव शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला. त्यामुळे वैभव या हंगामातील दुसरं आणि एकूण तिसरं शतक ठोकणार होता. मात्र वैभवचं शतक हे अवघ्या 7 धावांनी हुकलं. मात्र वैभवने या दरम्यान मोठा विक्रम मोडीत काढला.

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

वैभवची वादळी खेळी आणि महारेकॉर्ड ब्रेक

वैभवने लखनौ विरुद्ध 38 चेंडूत 93 धावा केल्या. वैभवने या खेळीत नेहमीप्रमाणे चौकार कमी आणि षटकार जास्त खेचले. वैभवने षटकार आणि चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. वैभवने या खेळीत 10 षटकार आणि 7 चौकार लगावले. वैभवने यासह आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल या दोघांना एका मोसमात सर्वाधिक षटकार लगावण्याबाबत मागे टाकलं.

वैभवने 10 षटकार लगावून 19 व्या मोसमात 53 षटकार पूर्ण केलं. वैभवने यासह आंद्रे रसेल याचा 52 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. रसेलने 2019 साली सर्वाधिक 52 षटकार लगावले होते. तर ख्रिस गेल याने 2013 साली सर्वाधिक 51 षटकार लगावले होते. तसेच एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर कायम आहे. मात्र वैभवला हा विक्रमही मोडीत काढण्याची संधी आहे.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

ख्रिस गेल याने 2012 साली आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक 59 षटकार लगावले होते. गेलचा हा विक्रम अजूनही कायम आहे. मात्र वैभव हा विक्रम मोडीत काढू शकतो. त्यासाठी वैभवला आणखी 7 षटकारांची गरज आहे. राजस्थानचा 19 व्या हंगामात साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना हा 24 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी वैभवला या सामन्यात 7 सिक्स खेचावे लागणार आहेत. त्यामुळे वैभव मुंबई विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एका हंगामात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

अधिक वाचा  महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

ख्रिस गेल : 59 सिक्स, 2012

वैभव सूर्यवंशी : 53 सिक्स, 2026

आंद्रे रसेल, 52 सिक्स,2019

ख्रिस गेल, 51 सिक्स, 2013

जोस बटलर, 45 सिक्स, 2022

ख्रिस गेल, 44 सिक्स, 2011

अभिषेक शर्मा, 42 सिक्स, 2024