होय, लैंगिक शोषण केलं, भोंदूबाबा अशोक खरातची अखेर कबुली; एसआयटी प्रमुखांची आज पत्रकार परिषद

0

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू असून यावेळी चौकशीत धक्कादायक समोर येत आहेत. चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसंच शोषण केल्याची अशोक खरातने कबुल केल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात, ती हातचलाखी असल्याचं अशोक खरातने मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे.

महिलांना जाळ्यात ओढण्याच्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव-

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचं समोर आलं आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे.

अधिक वाचा  एकनाथ शिंदेंचं 500 कोटींच्या बॉम्बवरुन जरांगेंना प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

युएईपर्यंतच्या हवाला रॅकेटचीही चौकशी-

अशोक खरात यांच्या बँक व्यवहारांसह मोठ्या प्रमाणातील मालमत्ता आणि युएईपर्यंत पोहोचलेल्या हवाला रॅकेटचीही चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. तपासात 130 हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी केली जात असून, त्यात ‘समता नागरी पतसंस्था’सह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. सुमारे 63 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे. अनेक खात्यांमध्ये खरात यांचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून असून, ती खाती त्यांच्या मोबाईल नंबरवर चालवली जात होती, असा प्राथमिक अंदाज आहे. तसेच पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 100 कोटींच्या मालमत्तांवरही ED चे लक्ष आहे. या मालमत्ता त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे यांच्या नावावर असल्याचे सांगितले जाते. 2024 मध्ये पोफळे यांनी 18 रो-हाऊस आणि सुमारे 49 गुंठे जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. अधिकृत किमत 19.56 कोटी रुपये असली तरी बाजारमूल्य 100 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे काळा पैसा, कर चुकवेगिरी आणि बेनामी गुंतवणुकीचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच नाशिक, सिन्नर आणि शिर्डी येथे 52 हून अधिक जमिनींची चौकशी ईडी करणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

तेजस्वी सातपुते आज पत्रकार परिषद घेणार-

अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून खरातने महिलांचे लैंगिक शोषण,आर्थिक गैर व्यवहार तसेच इतर काळे कारणामे केल्याप्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दाखल गुन्हा संदर्भात सुरू असलेल्या तपासाची एसआयटीकडून महत्वाची माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासानंतर स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच प्रत्यक्ष साधणार माध्यमांशी संवाद आहेत.