चांदणी चौक जैन मंदिर मध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

0

बावधन येथील चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर मध्ये (सोमवार दि.३०) भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नित्य अभिषेक, ध्वजारोहण, चढावे, पूजन, महाभिषेक, भगवान महावीरांचा भव्य पालखी सोहळा, महाआरती, सत्कार समारंभ, वार्षिक आढावा वाचन, जन्मोस्तव-पाळणा, महाप्रसाद इ. विविध धार्मिक तसेच रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर तसेच जैन पाककला, चित्रकला स्पर्धा आदी विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त मंदिर परिसरात मंडप उभारून नेत्रदीपक विदयुत रोषणाई करण्यात आली होती.

भगवान महावीर यांचा २६२५ वा जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त सकाळी नित्य अभिषेक झाल्यानंतर ध्वजारोहण प्रेमलता दोशी व रौनक दोशी परिवार तर पालखी मिरवणूक मध्ये महावीरांची प्रतिमा विराजमान करण्याचा चा मान प्रीतम मेहता परिवार व जिनवाणी शास्त्र चा मान रेणुका बंडी यांना मिळाला.

अधिक वाचा  राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदल येथे ‘अवकाळी’ची शक्यता; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आसुसलेल्या आशा पालवल्या

दरम्यान सकाळी नगरसेवक दिलीपअण्णा वेडे पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ६३ जणांनी रक्तदान केले तर २५२ नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला, यासाठी पुणे ब्लड बँक व देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.

सकाळी ९ वाजता भगवान महावीर यांची प्रतिमा चांदीच्या पालखीत विराजमान करून पालखी सोहळा व शोभा यात्रा ची सुरवात झाली. यावेळी “त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की”, “अहिंसा परमो धर्म की जय” तसेच नमोकार महामंत्राच्या जयघोषात भव्य पालखी-शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली.

सुमधुर बँडच्या तालावर जैन युवक-युवतींनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला. पालखी मिरवणूक मार्गावर बावधन मधील नगरसेवक दिलीप वेडे पाटील आणि नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी भव्य स्वागत कमान तर नगरसेवक पृथ्वीराज सुतार, नगरसेविका अल्पना गणेश वरपे, नगरसेविका रुपाली पवार यांनी स्वागत फलक उभारून पालखी मिरवणुकीचे स्वागत केले. यानंतर मुख्य मूर्तीचा अभिषेक, शांतिधारा व महाआरती मंदिर मध्ये संपन्न झाली. दुपारी १२ वा. भगवान महावीरांचा जन्मोस्तव-पाळणा संपन्न झाला. यावेळी भगवान महावीर महाशांतीधरा : अतुल जैन परिवार,

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

भगवान चंद्रप्रभु महाशांतीधरा : विशाल आहाळे, भगवान मुनीसुव्रतजी महाशांतीधरा : सौरभ गांधी, त्रिशला माता : सायली अमित पाटील आणि आत्या : रेणुका बंडी, इंद्रायणी चोगुले यांना मान मिळाला. यानंतर वार्षिक आढावा वाचन करून जैन पाककला स्पर्धे व चित्रकला स्पर्धा चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. त्यानंतर सर्वांनी वास्तल्य भोजनाचा लाभ घेतला. संध्याकाळी महाआरती संपन्न झाली व नंतर पंडितजी सागर हुक्कीरे यांचे धर्म प्रवचन संपन्न झाले.

 जन्मकल्याणक महोत्सव निमित्त नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेविका रुपाली पवार, नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, जगन्नाथ कुलकर्णी, नवनाथ जाधव, गणेश वरपे, सचिन पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, पुढील आठ महिन्यासाठी पालिकेचे आज कठोर निर्बंध,’या लोकांना पाणी वापरता येणार नाही…

यावेळी भगवान महावीर मंडळ आणि जैन मंदिराचे विश्वस्त उदय लेंगडे, ज्योती बुरसे, शिरीष बोरगावे, अशोक मगदूम, दिनेश गणेशवाडे, सुनील बिरनाळे, मोहन कुडचे, रमेशभाई शहा, अजित शेट्टी, महावीर पालगौडर, प्रीतम मेहता, अमित गांधी, तात्यासाहेब खोत, कुमार थोटे, अभिजित शहा, शोभा पोकळे, प्रकाश कुडचे, विशाल दगडे, प्रशांत गोधा, प्रशांत पाटील, केतन खापरे, चेतन जैन, शुभम बिंदगे, प्रीती पाटील, सागर हुक्कीरे पंडितजी उपस्थित होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित कोथरूड व बावधन परिसरातील जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.